काँग्रेसचा निवडणूक जाहिरनामा आज होणार जाहिर

काँग्रेसचा निवडणूक जाहिरनामा आज होणार जाहिर

  • Share this:

Image img_95132_sonia-pm_240x180.jpg26 मार्च : काँग्रेसचा निवडणूक जाहिरनामा जाहीर होणार आहे. 'तुमचा आवाज, आमची प्रतिज्ञा', असं असणार आहे काँग्रेसचं नवीन घोषवाक्य. खासगी क्षेत्रात एससी, एसटी आरक्षण सक्तीचं करण्याचं आश्वासन काँग्रेस देणार असल्याचं, सूत्रांकडून कळतंय.

भ्रष्टाचारविरोधी कडक कायदे बनवण्याचं आश्वासन काँग्रेस देणार आहे. त्याचबरोबर अन्न सुरक्षा अधिकार, शिक्षण अधिकार कायदा दिल्यानंतर काँग्रेसचं पुढचं लक्ष्य आता आरोग्याचा अधिकार आहे. याचं आश्वासनही या जाहिरनाम्यात असण्याची शक्यताय.

महिला आणि युवांना आकर्षित करण्यासाठीही प्रयत्न केले जातील. राजकारणात महिलांना आरक्षण, काळा पैसा परत आणणं, रोजगारासंबंधी आश्वासनं आणि तरूण आणि मध्यमवर्गावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शेतकर्‍यांसाठीही काही महत्त्वाची आश्वासनं या जाहिरनाम्यात असण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या जाहिरनाम्यात काय आश्वासनं असण्याची शक्यता आहे ते पाहूया...

  • तरुण आणि मध्यमवर्गीयांसाठी योजना
  • आरटीआयनंतर आता राईट टू हेल्थ योजना
  • राजकारण, न्यायसंस्था आणि पोलिसांमध्ये महिलांना आरक्षण
  • खासगी क्षेत्रात एससी आणि एसटी आरक्षण
  • शेतकर्‍यांना आणखी सुविधांचं आश्वासन
  • काळा पैसा परत आणण्याचं आश्वासन
  • काळाबाजारावर नियंत्रण

First published: March 26, 2014, 10:36 AM IST

ताज्या बातम्या