मुझफ्फरनगरच्या दंगलीची सीबीआय चौकशीची गरज नाही - सुप्रीम कोर्ट

मुझफ्फरनगरच्या दंगलीची सीबीआय चौकशीची गरज नाही - सुप्रीम कोर्ट

  • Share this:

muzzafarnager raoit26 मार्च :   मुझफ्फरनगर दंगलीप्रकरणात सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला दणका दिला आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात उसळलेल्या दंगलीप्रकरणी सीबीआय चौकशीची आवश्यकता नसल्याचे सुप्रीम कोर्टाने बुधवारी स्पष्ट केले. तसेच याप्रकरणी गुप्तचर यंत्रणांनाही सुप्रीम कोर्टाने फटकारलं.

या प्रकरणी राज्य सरकारने केलेल्या चौकशीबाबतसुप्रीम कोर्टाने समाधान व्यक्त केले. मात्र या दंगली सुरू झाल्यावर राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याचा ठपका सरकावर ठेवण्यात आला आहे.

नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचं सांगत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारच्या काराभारावर ताशेरे ओढले.

First published: March 26, 2014, 11:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading