नरेंद्र मोदी नाराज अडवाणींच्या भेटीला

  • Share this:

Narendra Modi, Lal Krishna Advani20  मार्च : भाजपमध्ये आता ज्येष्ठे नेते लालकृष्ण अडवाणींचं मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नरेंद्र मोदींनी आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. अडवाणींची नाराजी दूर करण्यासाठी ही भेट घेतल्याचे समजते. लालकृष्ण अडवाणी यांना गुजरातमधील गांधीनगर येथून तिकीट देण्यात आले आहे.

अडवाणींना यंदा मध्यप्रदेशमधील भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी हवी होती. मात्र भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने अडवाणींना गांधीनगरमधूनच उमेदवारी दिली आहे. या निर्णयामुळे अडवाणी नाराज झाले आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी मोदींनी आज गुरुवारी सकाळी लालकृष्ण अडवाणींच्या निवासस्थानी जाऊन  भेट घेतली.

दरम्यान, भाजप नेत्या सुषमा स्वराज याही अडवाणींची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहचल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 20, 2014 10:19 AM IST

ताज्या बातम्या