मोदींसाठी राहुल गांधींच्या सर्टिफिकेटची गरज नाही :भाजप

  • Share this:

sdgf45 modi  rahul765717 मार्च : नरेंद्र मोदींना राहुल गांधींकडून सर्टिफिकेटची गरज नाही, असा पलटवार भाजपने काँग्रेसवर केलाय. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांनी 2002 च्या गुजरात दंगली प्रकरणी नरेंद्र मोदींना क्लीन चिट देण्यात घाई केली अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती.

यावरून आज भाजपने राहुल गांधींवर टीकेची झोड उठवलीय. काँग्रेसची साथ सोडणार्‍या घटक पक्षांना रोखण्यासाठी आणि निवडणूक लढायला तयार नसलेल्या ज्येष्ठ नेत्यांचं मनोधौर्य उंचावण्यासाठी राहुल गांधी अशी आक्रमक भाषा करत असल्याचं भाजपनं म्हटलं आहे.

तसंच काँग्रेसला 2009पेक्षा चांगलं यश मिळेल, असंही राहुल गांधी यांनी या मुलाखतीत म्हटलं होतं. पण, राहुल गांधी वास्तवाकडे दुर्लक्ष करत असल्याची टीकाही भाजपनं केलीय.

First published: March 17, 2014, 9:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading