बाबा रामदेवांचे घूमजाव, मोदींबद्दल तसं बोललोच नाही !

बाबा रामदेवांचे घूमजाव, मोदींबद्दल तसं बोललोच नाही !

  • Share this:

fgbaba ramdev 44417 मार्च : नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी घाई करतायत असं वक्तव्य करुन खळबळ उडवून देणारे योगगुरू बाबा रामदेव यांनी आता घूमजाव केलंय. रामदेव बाबांनी आपण तसं काही बोललोच नाही असं सांगत मीडियावरच खापर फोडलं.

नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी पाठिंबा देण्यामागे कुठलीही सौदेबाजी नाही. आणि मी आपल्या कुठल्याही कार्यकर्त्यासाठी तिकीट मागितलं नाही, असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे.

बाब रामदेवांनी थेट भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी अतिउत्साह दाखवत असून त्यांना संयम राखला पाहिजे असा सल्ला वजाटोला बाबा रामदेव यांनी लगावला होता.

तसंच रामदेव बाबांनी भाजपच्या तिकीट वाटपावरही नाराजी व्यक्त केली होती. याबाबत नितीन गडकरी यांनी रामदेव बाबांना लेखी आश्वासनही दिलं होतं. पण तरीही भाजपचे दिलेले आश्वासन सत्तेवर आल्यावर विसरू नये असा चिमटीही काढला होता. तर यावेळी त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावरही टीका केली. केजरीवाल यांनी मोदींच्या विरोधात उभं राहण्याचा निर्णय घेतला पण त्यांनी असंही जाहीर करावं की पराभवानंतर त्यांनी राजकीय सन्यास घ्यावा असा टोलाही रामदेव यांनी लगावला.

First published: March 17, 2014, 4:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading