वाराणसीत मोदी विरूद्ध केजरीवाल, अंतिम निर्णय 23 मार्चला

वाराणसीत मोदी विरूद्ध केजरीवाल, अंतिम निर्णय 23 मार्चला

  • Share this:

arvind_650_12261302595816 मार्च :  'नरेंद्र मोदींविरोधात लढण्याचे आव्हान मी स्वीकारतो. मला पक्षाने तिकीट दिले असले तरी ही निवडणूक जनतेची आहे. मी मोदींविरोधात निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय आता वाराणसीची जनताच ठरवेल. यासाठी २३ मार्चरोजी वाराणसीत जाहीर सभा घेणार' असल्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

शनिवारी रात्री भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने वाराणसीतून भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. या मतदारसंघातून मोदींविरोधात अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा आपच्या नेत्यांनी व्यक्त केली होती. यावर केजरीवाल यांनी रविवारी बंगळुरुतील जाहीर सभेत 'मोदीं विरोधात निवडणूक लढवायण्याचे हे कठीन आव्हान मी स्वीकारतो!' अशी जाहीर घोषणा केली.

त्याचं बरोबर 'मी 'आम आदमी' आहे. माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्ते नाहीत, पैसेही नाहीत. पण ही निवडणूक जनतेची असून मी फक्त एक चेहरा आहे. त्यामुळे मी मोदींविरोधात निवडणूक लढवावी का याचा निर्णय २३ मार्च रोजी वाराणसीच्या सभेतील जनमतानंतरच घेऊ,' असंही केजरीवाल म्हणाले.

मोदी वाराणसीसह गुजरातमधील सुरक्षित मतदारसंघातूनही निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त आहे. यावरुनही केजरीवाल यांनी मोदींना चिमटा काढला. 'देशाला धैर्यवान पंतप्रधान हवा असून सेफ मतदारसंघातून निवडणूक लढवणारा पंतप्रधान नको' असे केजरीवाल यांनी सांगितले. या सभेत त्यांनी मोदीवर जोरदार टीका केली. मोदींच्या गुजरातच्या विकास मॉडेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच कर्नाटकमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांना मोदींनी कसे पक्षात घेतले असा सवालही त्यांनी विचारला.

भाजप आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल 

केजरीवाल यांनी काँग्रस आणि भाजप या देशातील दोन्ही मोठ्या पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, जनता काँग्रेस आणि भाजपमुळे दुःखी आहे. त्यांना परिवर्तन हवे आहे. यूपीएच्या काळात सर्वाधिक भ्रष्टाचार झाला आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी घोटाळा केला आहे.

उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षावर टीका करताना केजरीवाल म्हणाले, राज्यातील लोक अखिलेश आणि मायावती यांना वैतागले आहेत. उत्तरप्रदेशात अखिलेश यांचे सरकार सत्तेवर येऊन दोन वर्षे होत नाही तर, तिथे 10 पेक्षा जास्त दंगली झाल्या आहेत.

येदियुरप्पा, श्रीरामलू भ्रष्टाचारी

केजरीवालांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा आणि बी. श्रीरामलू यांच्यासह कर्नाटकातील इतर नेत्यांवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, मला कळत नाही, भाजपवर अशी काय नामुष्की आली होती जे त्यांनी येदियुरप्पांना परत पक्षात घेतले.

बेल्लारीच्या रेड्डीं बंधुसह श्रीरामलू यांच्यावर केजरीवालांनी निशाणा साधला. ते म्हणाले, लोक म्हणत आहेत, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर येदियुरप्पांना दुरसंचार मंत्री आणि श्रीरामलू यांना खाण मंत्रीपद मिळणार आहे.  याशिवाय केजरीवालांनी अनंतसिंह, सदानंद गौडा यांच्यासह अनेक नेत्यांवर वेगवेगळे आरोप केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 16, 2014 07:28 PM IST

ताज्या बातम्या