काही चॅनल्स पैसे घेऊन बातम्या दाखवतात, 'आप'ची आगपाखड

काही चॅनल्स पैसे घेऊन बातम्या दाखवतात, 'आप'ची आगपाखड

  • Share this:

aap sanjay sinha ashutosh14 मार्च : आम आदमी पक्षाने आता मीडियावरच निशाणा साधलाय. काही चॅनल्स आमच्या विरोधात सातत्यानं खोट्या आणि चुकीच्या बातम्या देतात. अशा इंडिया टीव्ही, इंडिया न्यूज आणि झी न्यूज या तीन चॅनल्सची आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत, असं पक्षाचे नेते आशुतोष आणि संजय सिंह यांनी जाहीर करून टाकलंय. तर दुसरीकडे खुद्ध अरविंद केजरीवाल यांनी आप सत्तेत आल्यावर पेड मीडियाला जेलमध्ये टाकू असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. पण त्यानंतर त्यांनी घूमजाव केलं.

आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचा दोनच दिवसांपुर्वी मुंबईत दौरा झालाय. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीत कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे गोंधळ उडाला होता. या गोंधळात वाहतुकीचे नियम आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं. या प्रकरणी केजरीवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र केजरीवाल यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत मीडियामुळेच गोंधळ झाला. या गोंधळाला मीडियाच जबाबदार आहे असा आरोपच केजरीवाल यांनी केला.

सत्तेत आल्यावर पेड मीडियाला जेलमध्ये टाकू -केजरीवाल

त्यानंतर केजरीवाल नागपूरमध्ये पोहचले. '10 हजार रुपये भरा आणि केजरीवाल यांच्यासोबत जेवण करा' हा 'डिनर विथ केजरीवाल' निधी संकलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पुन्हा केजरीवाल यांनी मीडियावर निशाणा साधला. खोट्या बातम्या आणि पेड न्यूज दाखवणार्‍या माध्यमांना सत्तेत आल्यास जेलमध्ये टाकू असं वक्तव्य केजरीवाल यांनी केलं. पण केजरीवाल यांच्या विधानामुळे चोहीकडून टीका होऊ लागली त्यामुळे सारवासारव करत आपण तसं म्हणालो नाही असं स्पष्टीकरण केजरीवाल यांनी दिलं.

मात्र 'आप'ची मीडियावर आगपाखड सुरूच होती. दिल्लीत आपचे नेते आशुतोष आणि संजय सिंह यांनी सयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि तीन वृत्तवाहिन्यांवर थेट आरोप केले. काही चॅनल्स आमच्या विरोधात सातत्यानं खोट्या आणि चुकीच्या बातम्या देतात. अशा इंडिया टीव्ही, इंडिया न्यूज आणि झी न्यूज या तीन चॅनल्सची आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत असं संजय सिंह यांनी स्पष्ट केलं. आणखी एक इंग्रजी चॅनल आमच्या विरोधात आहे असा आरोपही सिंह यांनी केला. या तिन्ही चॅनल्सनी आमच्या विरोधात ज्या काही बातम्या दाखवल्यात त्याचे पुरावे आमच्याकडे हे पुरावे आयोगाकडे देऊ असंही सिंह म्हणाले.

First published: March 14, 2014, 3:47 PM IST

ताज्या बातम्या