देवयानी खोब्रागडेंवरील खटला रद्द

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Mar 13, 2014 01:12 PM IST

devyani13 मार्च :  भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना न्यूयॉर्कमधील न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्याविरुद्ध व्हिसा गैरव्यवहारप्रकरणी दाखल असलेली याचिका रद्दबातल करण्यात आली आहे.

 

देवयानी खोब्रागडे यांच्याविरोधात व्हिसा गैरव्यवहार आणि सत्य माहिती लपविल्याप्रकरणी न्यूयॉर्कमधील न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने हि याचिका रद्द करण्याबरोबरच जामिनासंबंधी अटी व त्यांच्यावरील सर्व आरोप रद्द केले आहेत. तसेच त्यांच्याविरुद्ध असलेल्या आरोपांसंबंधात काढण्यात आलेले अटक वॉरंटही रद्द केले आहेत. 

 

या प्रकरणी देवयानींना 12 डिसेंबरला न्यूयॉर्कमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती. यामुळे कडक आक्षेप नोंदवत भारताच्या अमेरिकेतील दुतावासांवर कडक निर्बंध आणले होते. देवयानी यांच्यावर त्यांची मोलकरीण संगीता रिचर्ज यांच्याकडून जास्त काम करून घेण्याचा व पगार कमी दिल्याचा आरोप होता. भारताने देवयानी यांची अमेरिकेतून बदली करत संयुक्त राष्ट्र संघाच्या मिशनमध्ये सहभागी करून घेतले होते. त्यानंतर त्या भारतात परतल्या होत्या. सध्या त्या परराष्ट्र मंत्रालयात कार्यरत आहेत. देवयानींवरील याचिका रद्दबातल करण्यात आल्याने त्यांचे वडील उत्तम खोब्रागडे यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्‍यांचेही आभार मानले आहेत.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 13, 2014 09:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...