भाजपचा पलटवार, इंदिरा गांधीच खर्‍या हिटलर !

भाजपचा पलटवार, इंदिरा गांधीच खर्‍या हिटलर !

  • Share this:

javadekar and rahul12 मार्च : देशात जर कुणी हिटलरसारखं वर्तन केलं असेल तर ते राहुल गांधींच्या आजी इंदिरा गांधी यांनी, असा प्रतिहल्ला भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केलाय.

मंगळवारी राहुल गांधी यांची गुजरातच्या खेडा जिल्ह्यात सभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची अप्रत्यक्ष तुलना हिटलरशी केली. हिटलर लोकांचं मत ध्यानात घ्यायचा नाही, त्याला वाटेल ते जर्मनीत व्हायचं. काँग्रेस पार्टीची कार्यपद्धती अशी नाहीय असं म्हणून त्यांनी ही तुलना केली. मोदींच्या म्हणण्याप्रमाणे भाजप शेतकर्‍यांच्या जमिनींची चोकीदारी करत नाही, तर जमिनी चोरता अशी टीकाही राहुल यांनी केली.

राहुल गांधी यांच्या टीकेमुळे संतप्त झालेल्या भाजपच्या नेत्यांनी सडेतोड उत्तर दिलंय. देशात जर कुणी हिटलरसारखं वर्तन केलं असेल तर ते राहुल गांधींच्या आजी इंदिरा गांधी यांनीच केलं असं प्रत्युत्तर भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी दिलंय. काँग्रेसमधील हायकमांडची रचना नाझींसारखी आहे अशी जळजळीत टीकाही जावडेकर यांनी केली. त्यामुळे लोकसभेच्या आखाड्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये चिखलफेक सुरू झालीय.

First published: March 12, 2014, 6:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading