पाच सहकर्‍यांची हत्या करून लष्करी जवानाची आत्महत्या

Samruddha Bhambure | Updated On: Feb 27, 2014 01:06 PM IST

पाच  सहकर्‍यांची हत्या करून लष्करी जवानाची आत्महत्या

j&k soldiers27 फेब्रुवारी : जम्मू काश्मीरच्या मानसबल कॅम्पमधली एका लष्करी जवानाने पाच सहकारी जवानांची गोळीबार करून हत्या करत स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

लष्करी अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री मानसबल येथे असलेल्या 13 राष्ट्रीय रायफल्सच्या कँपमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेची लष्कराच्या न्यायालयाकडून चौकशी करण्यात येणार आहे. या घटनेबाबत लवकरच सविस्तर माहिती देण्यात येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2014 09:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close