राजकीय नेत्यांच्या होळीचा रंग यंदा फिकाच

11 मार्च, नवी दिल्लीसुमीत पांडे देशभरात उत्साहात रंगांची उधळण होत आहे. पण राजकीय नेत्यांच्या होळीचा रंग यंदा फिकाच आहे. मुंबई हल्ला आणि बिहारच्या पुरामुळे राजकीय नेत्यांमध्ये होळीचा उत्साह तसा कमीच आहे. राजकीय नेत्यांमध्ये यंदा होळीचा उसाह नाही. कोणी मुंबई हल्ल्यामुळे होळी साजरी करायचं नाही असं ठरवलंय. तर कुणाला बिहारमधल्या कोसी नदीच्या पुराचं दुःख आहे. पण त्यांचे कार्यकर्ते मात्र होळीच्या रंगात रंगतायत. बिहारमध्ये यंदा राजकारण्यांच्या होळीचा रंग फिकाच आहे. याला राजकीय अपरिहार्यता म्हणा किंवा आणखी काही...लालू प्रसाद यादव यांची सुप्रसिद्ध काप्रा पार होळी यंदा साजरी होणार नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांचासुद्धा मूड नाहीय. कोसी नदीच्या पुरात त्यांच्या होळीचे रंग वाहून गेलेत. दिल्लीतही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडं होळीचा विशेष उत्साह नाहीय. मुंबई हल्ल्यात ठार झालेल्यांना आदरांजली म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलाय. तशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस टॉम वडक्कन यांनी दिली आहे. पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मात्र हायकमांडकडून कोणताच बोध घेतलेला नसल्याच दिसतंय. धुळवडीची त्यांनी जय्यत तयारी केली आहे. भाजपचे कार्यकर्तेसुद्धा यात मागं नाहीयत. नवीन पटनायक यांनी निवडणुकीच्या तोंडावर दिलेल्या धक्क्याचा त्यांच्यावर बिलकुल परिणाम झालेला नाहीय. "सण साजरे करणार्‍यांवर कोणत्याही घटनेचा परिणाम होण्याचं कारण नाहीे, " अशी माहिती भाजपचे प्रवक्ता रविशंकर प्रसाद यांनी आहे. पण लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे भाजपचे ज्येष्ठ नेते मात्र होळी खेळणार नाहीयत. निवडणुकीचं गणित घालणार्‍या या नेत्यांना माहीत आहे, की आता काहीतरी त्याग केलं तर नंतर खूप काही मिळवणं शक्य आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Mar 11, 2009 06:27 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 11, 2009 06:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...