इच्छामरण याचिका आता घटनापीठाकडे- सुप्रीम कोर्ट

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 25, 2014 03:54 PM IST

Image aajjcha_sawal_aruna_shanbag_300x255.jpg25 फेब्रुवारी :  मरणासन्न परिस्थितीत, कोणतेही उपचार यशस्वी होण्याची शक्यता नसताना इच्छामरणाला परवानगी द्यायची का, यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. 2011 सालच्या, काही प्रमाणात इच्छामरणाला परवानगी देण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने प्रश्न उपस्थित केले आहेत.

सुप्रीम कोर्टाने हा प्रश्न पाच सदस्यांच्या घटनापीठाकडे पाठवला आहे. हा प्रश्न सामाजिक, कायदेशीर, वैद्यकीय आणि घटनात्मकरित्या महत्त्वाचा असल्यानं आम्ही याला घटनापीठाकडे पाठवत आहोत, असं कोर्टानं म्हटलं आहे. अरुणा शानबाग प्रकरणात इच्छामरणाला दिलेल्या परवानगीवरही सुप्रीम कोर्टानं प्रश्नचिन्हं उपस्थित केला आहे.

मुंबईतील केईएम रुग्णालयातील नर्स अरुणा शानबाग हिला इच्छामरण द्यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. रुग्णालयातील कर्मचार्‍याने 27 नोव्हेंबर 1973 रोजी ‍अरुणावर बलात्कार केला होता. तेव्हापासून त्या कोमात आहेत. अरुणाचे हाल पाहवत नसल्याने त्यांची मैत्रीण पिंकी विराणी यांनी अरुणाला इच्छामरण द्यावे, अशी याचिका दाखल केली होती.  पण, न्यायालयाने 7 मार्च 2011 मध्ये ही याचिका फेटाळली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2014 11:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...