'आप'च्या प्रचाराचा नारळ आज फुटणार

'आप'च्या प्रचाराचा नारळ आज फुटणार

  • Share this:

delhi shapat kejriwal23 फेब्रुवारी :  दिल्ली विधानसभेत आपल्या पक्षाची दखल घेण्यास भाग पाडणाऱ्या आम आदमी पक्षाची लोकसभा निवडणुकीची प्रचार मोहीम आज (रविवार) पासून सुरू होत आहे.केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजिनामा दिल्यानंतर 'आप'चा हा पहिलाच राज्यस्तरीय मेळावा असणार आहे. पक्ष प्रमुख अरविंद केजरीवाल यावेळी रोहतकमध्ये एका कामगार मेळाव्यास संबोधित करणार आहेत.

आपचे राष्ट्रीय कार्य़कारी सदस्य नवीन जय हिंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मेळाव्यात आपचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव देखील मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सामान्यांचे प्रश्न आमच्यापर्यंत पोचावे यासाठी आपचे स्वयंसेवक यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद साधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

First published: February 23, 2014, 3:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading