दिल्लीकडे केली होती कूच, लष्करी अधिकार्‍यांची कबुली

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 21, 2014 03:17 PM IST

दिल्लीकडे केली होती कूच, लष्करी अधिकार्‍यांची कबुली

a. k. chaudhary21 फेब्रुवारी :   दोन वर्षांपूर्वी लष्कराच्या मेकॅनाईज्ड इन्फन्ट्री युनिट आणि पॅराट्रूपच्या तुकड्या दिल्लीच्या दिशेने कूच होत्या, अशी वृत्ताला माजी लेफ्टनंट जनरल ए. के. चौधरी यांनी दुजोरा दिला आहे.

चौधरी हे 2012मध्ये लष्करी हालचाली विभागाचे महासंचालचक महासंचालक म्हणून कार्यरत होते. 'द इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी ही कबुली दिलीे. 4 एप्रिल 2012 इंडियन एक्सप्रेसनं छापलेल्या याचं बातमीमुळे देशात खळबळ उडाली होती.

संरक्षणमंत्री ए.के. अँटोनी आणि तत्कालीन लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांच्यातल्या संवादाच्या अभावामुळे केंद्र सरकाला लष्कराच्या हेतूबद्दल शंका वाटून भीती वाटली अशी कबुली चौधरी यांनी दिली आहे.

तत्कालीन लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंग यांचा केंद्र सरकारशी जन्मतारखेच्या दाखल्यावरून वाद सुरु असताना लष्कराच्या काही तुकड्यांनी पंतप्रधान कार्यालय आणि संरक्षण मंत्रालयाला केंद्र सरकारला अंधारात ठेवून दिल्लीच्या दिशेनं कूच केलं होतं.

त्यामुळे लष्करामध्ये बंडाळी होत असल्याचा संशय केंद्र सरकारला आला होता. मात्र, तेव्हा संरक्षणमंत्री ए.के. अँटोनी आणि लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंग या दोघांनीही त्या बातमीचं खंडन केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2014 02:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...