हे कसले लोकप्रतिनिधी ?, राज्यसभेत धक्काबुक्की,सुरक्षा रक्षकाला लगावली थप्पड

हे कसले लोकप्रतिनिधी ?, राज्यसभेत धक्काबुक्की,सुरक्षा रक्षकाला लगावली थप्पड

  • Share this:

Ruckus19 फेब्रुवारी : तेलंगणाच्या मुद्यावरुन लोकसभेत एका खासदारानं पेपर स्प्रे फवारला ही घटना घडून आठवडाही उलटत नाही तोच आणखी एक लोकशाहीला काळिमा फासणारी घटना घडलीय. तेलंगणाच्या मुद्यावरून राज्यसभेत सेक्रेटरी जनरलना खासदारांनी धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना घडली. तर जम्मू-काश्मीर विधानसभेत आमदारानं मार्शलला तीन वेळा थप्पड लगावली. तर उत्तर प्रदेश विधानसभेत समाजवादी सरकारचा विरोध करताना विरोधी आमदारांनी चक्क शर्ट काढले.

 राज्यसभेत सेक्रेटरी जनरल यांना धक्काबुक्की

संसदेच्या शेवटच्या अधिवेशनात दोन्ही सभागृहांची सदस्यांनी अप्रतिष्ठा करण्याचे अनेक प्रकार बघायला मिळाले. आज त्यामध्ये आणखी भर पडली. तेलुगू देसम पक्षाचे खासदार सीएम रमेश यांनी राज्यसभेचे सेक्रेटरी जनरल यांना भर सभागृहात धक्काबुक्की केली. रमेश यांच्यासह काही खासदार हे तेलंगणाविषयक कागदपत्र फडकावत होते. तसं करण्यास राज्यसभेच्या उपसभापतींनी मनाई केली. पण सभासद बधले नाहीत.

 सुरक्षा अधिकार्‍यालाच थप्पड लगावली

जम्मू-काश्मीर विधानसभेत आज प्रचंड गदारोळ झाला. माजी आरोग्यमंत्री शाबीर खान यांच्यावरचे लैंगिक अत्याचाराचे आरोप आणि इतर स्थानिक मुद्द्यांवरून आमदारांनी धुडगूस घातला. पीडीपीचे नेते सय्यद बशीर अहमद यांनी विधानसभेतल्या सुरक्षा अधिकार्‍यांच्याच चक्क तीनदा थोबाडीत मारली. अहमद यांनी अध्यक्षांच्या वेलमध्ये जाऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. अध्यक्षांच्या आदेशावरून सुरक्षा अधिकारी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी त्यांनी अधिकार्‍यांच्याच थोबाडीत मारली.

आमदारांनी कपडे काढले

तर उत्तर प्रदेश विधानसभेच्या अधिवेशनाला आजपासून वादळी सुरुवात झाली. समाजवादी पक्ष अपयशी ठरल्याच्या घोषणा देत बहुजन समाज पक्षाच्या आमदारांनी फलक झळकावले. हा गदारोळ इतका वाढला की आरएलडीच्या दोन आमदारांनी तर सभागृहातच आपले शर्ट काढले.

First published: February 19, 2014, 3:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading