Elec-widget

वेगळ्या तेलंगणाला विरोध का ?

वेगळ्या तेलंगणाला विरोध का ?

  • Share this:

महेश तिवारी, हैदराबाद

18 फेब्रुवारी : तेलंगणाच्या निर्मितीला सीमांध्रच्या जनतेचा तीव्र विरोध आहे. आंध्र प्रदेशची राजधानी असलेल्या हैदराबाद या ऐतिहासिक शहराचा ताबा तेलंगणाकडे जाईल या भीतीनंच सीमांध्रची जनता स्वतंत्र तेलंगणाला विरोध करतेय. सीमांध्रमधल्या अनेकांनी हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केलीये.

हैदराबाद... दक्षिण भारतातलं एक महत्त्वाचं शहर... आणि याच शहरावरून तेलंगणासमर्थक आणि विरोधक असा संघर्ष सुरू आहे. आणि त्याला कारणीभूत आहे, हैदराबादभोवती फिरणारं अर्थकारण..हैदराबादमध्ये सीमांध्रच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून ठेवलीये. हैदराबाद तेलंगणामध्ये गेल्यानंतर तिथलं वर्चस्व कमी होईल या भीतीनं सीमांध्राच्या नेत्यांनी तेलंगणाला विरोध सुरू केलाय.

हैदराबादमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक कशी आहे ?

Loading...

हैदराबादच्या बांधकाम व्यवसायात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक सीमांध्र भागातील आहे. अपोलो, यशोदा, कीम्स, केअर अशा मोठ्या हॉस्पिटलसह हैदराबादमधला सत्तर टक्के वैद्यकीय व्यवसाय सीमांध्रच्या लोकांच्या ताब्यात आहे. बॉलिवूडनंतर सर्वाधिक कमाई करणारी तेलुगू चित्रपटसृष्टी पूर्णपणे सीमांध्रमधून आलेल्या लोकांच्या ताब्यात आहे. राज्याचे बहुतेक सर्व आर्थिक व्यवहार हैदराबादमध्ये होतात. 20 पेक्षा जास्त तेलुगू चॅनल्स, प्रमुख वृत्तपत्रांची मालकी सीम्रांधच्या लोकांकडे आहे. स्वाभाविकच सीमांध्रच्या नेत्यांचा तेलंगणाच्या निर्मितीला विरोध आहे.

एकंदरीतच हैदराबादमध्ये सीमांध्रातल्या नेत्यांचे आणि नागरिकांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्यामुळे हा प्रश्न आणखी चिघळलाय असं म्हणावं लागेल.

 हैदराबादवरून तिढा - आर्थिक हितसंबंध

  • - सीमांध्रच्या व्यावसायिकांची बांधकाम व्यवसायात 50 टक्के गुंतवणूक
  • - मोठ्या हॉस्पिटल्ससह 70 टक्के वैद्यकीय व्यवसाय सीमांध्रच्या व्यावसायिकांच्या हातात
  • - तेलुगू चित्रपटसृष्टी पूर्णपणे सीमांध्रच्या व्यावसायिकांच्या हातात
  • - बहुतेक सर्व आर्थिक व्यवहार हैदराबादमध्ये
  • - 20 तेलुगू चॅनल्स, वर्तमानपत्रांची मालकी सीमांध्रच्या व्यावसायिकांच्या हातात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2014 08:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...