काय होणार स्वस्त ?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 17, 2014 02:42 PM IST

काय होणार स्वस्त ?

badget 201417 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदार राजाला खूश करण्यासाठी केंद्राने मोकळ्या 'हाता'ने घोषणा केल्या आहेत. आज केंद्रीय अर्थमंत्री पी.चिंदबरम यांनी हंगामी बजेट सादर केलं. या बजेटमध्ये करदात्यांना दिलासा देण्यात आला. प्राप्तिकरात कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे इन्कम टॅक्स जैसे थेच आहे.

त्याचबरोबर स्वत:च्या कारमधून फिरण्याचं सर्वसामान्यांचं स्वप्न साकार करण्याचा सरकारने प्रयत्न केलाय. छोट्या कार आता स्वस्त होणार आहे तर मोटारसायकल स्वस्त होणार आहे. पण दुचाकींसाठी आता एक्साईट ड्युटी 8 टक्के करण्यात आली.

त्याचप्रमाणे देशात मोबाईल उद्योजकात वाढ मिळावी यासाठी देशात तयार होणारे 'मेड इन इंडिया' असणारे मोबाईल स्वस्त होणार आहे. तसंच घरघुती वस्तुंमध्येही चिंदबरम यांनी दिलासा दिला असून फ्रिज आणि टीव्ही स्वस्त होणार आहे. एकंदरीत निवडणुकांचं चांगभलं म्हणत चिंदबरम यांनी स्वस्तात मस्त बजेट सादर केलंय.

हे होणार स्वस्त

    Loading...

  • छोट्या कार
  • मोटारसायकल
  • देशात तयार होणारे मोबाईल
  • फ्रिज
  • टीव्ही
  • साबन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 17, 2014 02:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...