रिअल हिरो - गंगेच्या स्वच्छतेसाठी झटणारे संत गुड्डू बाबा

4 मार्च, पाटणा गंगा नदीचं पावित्र्य कसं जपावं, हा प्रश्न अनेकांना पडतो. पण काथी पटणा शहरात राहणारे गुड्डूबाबा हे गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी झटताहेत. गंगेचं पावित्र्य जपण्यासाठी अहोरात्र खपत आहेत. गंगेची स्वच्छता ही गुड्डूबाबा या माणसाकरता ही फक्त एक प्रार्थना नाहिये , तर तो त्यातल्या शब्दाप्रमाणे जगतो. कुठलाही दिवस असू दे हा माणूस गंगा नदीच्या काठी काही मदतनीसांना घेऊन हातात फावडं ,घमेलं आणि मनात नदीविषयीचं प्रेम घेऊन फिरताना दिसतो. गेली 15 वर्षं गुड्डु बाबा गंगा बचाव आंदोलनाचं नेतृत्व करताहेत. जे लोक नदीत डुबकी घेतात, नदीच्या काठी रहातात अशालोकांचं ते प्रबोधन करतात. नदीत मइला टाकला जाउ नये याकरिता कायदेशीर लढाया लढतात. गुड्डू बाबा फक्त प्रार्थना करून थांबत नाहीत तर स्वत:चे हात खराब करतात. गंगा स्वच्छ नदी व्हावी हा एवढाच त्यामागचा हेतू आहे. पश्चिम चंपारण मधल्या एका कॉलेज मध्ये शिकवणारे गुड्डू बाबा गंगा नदी काठच्या पाटणा शहरात स्थायिक झाले आहेत. ऩदीत फेकले गेलेले मृतदेह आणि त्याच पाण्यात लोक अतिशय भक्तिभावाने डुबकी घेताना पाहून गुड्डू बाबांनी नदीतून मृतदेह बाहेर काढ़ून त्यांचं दफन करणं सुरू केलं.1995 मध्ये गुड्डूबाबांनी पाट्णा उच्च न्यायालयात एक जनहीत याचिका दाखल केली व त्यात त्यानी गंग़ा प्रदूषण मुक्त करण्याची मागणी केली होती. ही चळवळ त्यांनी अशा लोकांपर्यंत नेली की ज्यांचं आयुष्य थेट नदीशी निगडीत होतं आणि याचा परिणाम असा झाला की पाट्ण्याच्या मेडीकल कॉलेज ने मृतदेह फेकणं थांबवलं नि मृत अवस्थेत गेलेल्या 9 शव वाहिन्यांपैकी 2 वाहिन्या सुरू केल्या. गुड्डू बाबा आणि त्यांचे सहकारी जे काम करत आहेत ती दृश्यं अतिशय विचलीत करणारी आहेत. अर्धवट जळलेली शरीर आणि मृत प्राण्याचे अवशेश बाहेर काढून त्यांचं दफन गुड्डू बाबांचे सहकारी करतात. पण गुड्डू बाबांना हे पुर्णपणे माहीत आहे की हे सगळं पुरेसं नाहिये.अजून खूप काम करावं लागणार आहे. गुड्डू बाबा आज एकांडे शिलेदार आहेत .गुड्डू बाबा जणू एक संत आहे, एका ध्येयाने झपाटलेला संत.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 4, 2009 05:46 PM IST

ताज्या बातम्या