काँग्रेस-राष्ट्रवादीचा 26 -22 चा फॉर्म्युला कायम

  • Share this:

cm on pawar10 फेब्रुवारी : काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटलाय. या निवडणुकीसाठी 26-22 चा हा जुनाच फॉर्म्युला निश्चित केला गेला आहे. काँग्रेस 26 तर राष्ट्रवादी 22 जागांवर लोकसभा निवडणूक लढणार आहे. राष्ट्रवादीला 22 जागा द्यायला इतके दिवस काँग्रेसचा विरोध होता. पण दिल्लीत झालेल्या बैठकीत काँग्रेसनं एक पाऊल मागे घेतलं.

आज (सोमवारी) संध्याकाळी नवी दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या निवास्थानी ही बैठक पार पडली. काँग्रेस अध्यक्षांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रभारी मोहन प्रकाश तसंच राष्ट्रवादीतर्फे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव हे नेते या बैठकीला उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून जागा वाटपावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू होती. राष्ट्रवादीने 14 उमदेवारांची यादी तयारही केली होती पण काही जागांच्या अदलाबदलीसाठी काँग्रेससोबत चर्चेसाठी राष्ट्रवादी वेटिंगवर होती. मात्र जागावाटपासाठी 'इतकी घाई कशाला' अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती. काँग्रेसला 19-29 अशी जागावाटप व्हावी अशी इच्छा होती यासाठी काँग्रेसला काही काळ राष्ट्रवादीला वेटिंगवर सुद्धा ठेवले पण राष्ट्रवादीकडून दबावतंत्राच्या राजकारणामुळे अखेर काँग्रेसला एक पाऊल मागे घ्यावे लागले. आज दिल्ली बैठक पार पडली आणि नव्या निवडणुकीसाठी 'जुनीच बाटली' असा फॉर्म्युला कायम ठेवावा यावर शिक्कामोर्तब झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2014 09:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...