S M L

ओडिशा सरकार जनतेला रोजगार देत नाही - राहुल गांधी

Samruddha Bhambure | Updated On: Feb 9, 2014 06:15 PM IST

rahul team09 फेब्रुवारी : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कटक येथे नवीन पटनायक सरकारवर निशाणा साधला आहे. भारतातल्या सर्वराज्यांपैकी आडिशा प्रगतीच्या मार्गावर सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर येतो. साडेतीन हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केली, तर 10 लाख युवा या राज्यात बेरोजगार आहेत. जनतेला रोजगार हवा पण सरकार त्यांना रोजगार देत नसल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी ओडिशा सरकारवर केला आहे.

ओडिशासाठी पाठवला जाणारा निधी रस्त्यातच पळविला जातो. त्यासाठी ओडिशा सरकार जबाबदार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. बीजू जनता दलाच्या सरकारमुळे आदिवासींचा विकास खूंटला आहे. दलित आणि आदिवासींवर होणारे अन्याय अत्याचार काँग्रेस सत्तेत आल्यानंतरच थांबतील असा दावा त्यांनी केला आहे.


ओडिशामध्ये राहुल गांधींचा 50 किलोमीटर रोड शो

राहुल गांधी दोन दिवसीय ओडिशा  दौर्‍यावर आहेत. आज (रविवार) ओडिशामध्ये आल्यानंतर कटक पर्यंत त्यांनी रोड शो केला. जवळपास  50 किलोमीटर पर्यंत त्यांच हा रोड शो होता. कटकमध्ये त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. ओडिशा दौ-याच्या पहिल्या दिवशी त्यांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले.

Loading...

आडिशा येथील बीजू पटनायक विमानतळावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल यांचे जोरदार स्वागत केले. विमानतळावरून राहुल गांधींचा ताफा पक्षाच्या कार्यालयात पोहोचला आणि तेथून त्यांच्या रोड शोला प्रारंभ झाला. ओडिशामध्ये त्यांचा हा पहिला रोड शो होता. दोन दिवसांच्या  दौर्‍यात राहुल निवडणूक प्रचार सभा घेतील. त्याच बरोबर पक्षाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भेटी देखील ते घाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 9, 2014 05:06 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close