पटेल पक्षाचे नाही तर देशाचे नेते -मोदी

पटेल पक्षाचे नाही तर देशाचे नेते -मोदी

  • Share this:

27457345345345 modi on 508 फेब्रुवारी : काँग्रेस ज्यांना विसरलं त्यांचा पुतळा आम्ही बांधतोय, म्हणून काँग्रेसच्या पोटात दुखतंय, सरदार वल्लभभाई पटेल पक्षाचे नाही तर देशाचे नेते आहेत, असं प्रत्युत्तर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना दिलंय.

नरेंद्र मोदी यांनी आज ईशान्य भारतात प्रचाराचा नारळ फोडला. मोदी यांनी या अगोदर मणिपूरमधल्या इंफाळ आणि गुवाहाटीमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी ईशान्य भारताचा विकास, घुसखोरीचा प्रश्न उपस्थित केला.

गुजरातमध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. नरेंद्र मोदींनी महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्या आदर्शांचा अभ्यासच केला नाही. त्यांचं आयुष्य संघात गेलं आणि ते पटेल यांचे पुतळे बांधण्याचं नाटक करत आहे अशी थेट टीका राहुल यांनी मोदींवर केली.

राहुल यांच्या टीकेला मोदींनी प्रतिउत्तर दिलं. काँग्रेसचे नेते (राहुल गांधी) यांची विचार करण्याची क्षमता कमी आहे. पटेल हे कोणत्याही पक्षाचे नेते नसून ते देशाचे नेते आहे. तुमच्यासाठी पटेल नेते असतील तर आमच्यासाठी राष्ट्र नेते आहेत असं प्रतिउत्तर मोदी यांनी दिलं. तसंच आता फक्त 100 दिवस राहिले आहे असून काँग्रेसला जनता नक्की निरोप देईल असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.

First published: February 8, 2014, 6:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading