'आप'ची आता 'पोल खोल' मोहीम

'आप'ची आता 'पोल खोल' मोहीम

  • Share this:

aap 3404 फेब्रुवारी : भ्रष्ट नेत्यांची aयादी प्रसिद्ध करणार्‍या आम आदमी पार्टीनं आजपासून 'पोल खोल' मोहीम सुरू केली आहे. सर्वात आधी त्यांनी लक्ष्य केलंय द्रमुकला..

2जी घोटाळ्याप्रकरणी द्रमुक नेत्या कनिमोळी यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला असा आरोप 'आप'चे नेते प्रशांत भूषण यांनी केला. त्यासाठी त्यांनी काही ऑडियो टेप्स दिल्या आहेत. या टेप्स 'सावुक्कू.नेट' या तामिळ वेबसाईटनं अपलोड केलेल्या आहेत.

यात तामिळनाडूचे माजी पोलीस अधिकारी जफ्फार सेठ आणि करुणानिधी कुटुंबीयांच्या मालकीच्या कलैगनार टीव्हीचे माजी डायरेक्टर शरद कुमार यांच्यातला संवाद आहे. या टेप्सवरून आपले आरोप सिद्ध होत असल्याचं आपचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 4, 2014 06:04 PM IST

ताज्या बातम्या