विषाची पेरणी काँग्रेस करतं- मोदी

  • Share this:

narendra modi in jhanshi02 फेब्रुवारी : काँग्रेस पक्ष हा एका धर्माला दुसर्‍या धर्माशी, एका राज्याला दुसर्‍या राज्याशी लढवतो.देशा विषा पेरण्याचे काम काँग्रेस करतं, आशी सडेतोड प्रत्यूत्तर नरेंद्र मोदींनी रविवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिलं. सत्ता हे विष आहे असं माझी आई म्हणते, असं राहुल गांधी म्हणाले होते. मग एवढी वर्ष भारतात सत्ता कोण उपभोगतंय, असा सवालही त्यांनी केला.भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची आज मेरठमध्ये विजय शंखनाद सभा झाली. या सभेत त्यांनी सोनिया गांधींच्या कालच्या टीकेला मोदींनी उत्तर दिलं. त्याच बरोबर उत्तर प्रदेशमधल्या समाजवादी पार्टीच्या सरकारवरही मोदी बरसले. उत्तर प्रदेशात वीजेचं लोडशेडिंग नाही, तर वीड येणं ही बातमी होते, असं मोदी म्हणाले.

एकेकाळी गुजरातमध्ये दररोज दंगल होत होत्या, आज मात्र गुजरात दंगलमुक्त झाले आहे. उत्तरप्रदेशला दंगल मुक्त करायच असेल तर आमच्यावर विश्वास ठेवा असं आवाहनही मोदींनी यावेळेस केलं.

1857 च्या स्वातंत्र्य संग्रामाकडे काँग्रेस सरकारचे दुर्लक्ष आहे. फक्त काँग्रेसनेच देश स्वतंत्र केला असाच प्रसार आजपर्यंत केला जातोय, असं ही ते म्हणाले.

उत्तरप्रदेशच्या आर्थीक- विकासाकडे सरकारचं दुर्लक्ष आहे. मेरठच्या वीजेचा प्रश्न गंभीर असून, याठिकाणी वीज आली तर त्याची बातमी होते जोरदार टीका त्यांनी केली. साखर कारखाने बंद पडले, ऊस शेतकर्‍यांकडे सरकारचं लक्ष नसून, उत्तर प्रदेशात सपा सरकारमध्ये महीला सुरक्षित नाही . देशाचा विकास फक्त आश्वासनं देवुन होणार नाही. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो असं ही ते म्हणाले.

ईशान्य भारतातील लोकांची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. अरुणाचल प्रदेशातला एका विद्यार्थ्याची दिल्लीत हत्या होते, ही लज्जास्पद गोष्ट आहे. दिल्लीतली 'आप'ची सरकार ईशान्येकडच्या विद्यार्थांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरली आहे, असंही मोदी म्हणाले.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 2, 2014 03:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...