ऑगस्टा हेलिकॉप्टर प्रकरण : सोनिया गांधी अडचणीत ?

  • Share this:

Image img_214482_soniyagandi464_240x180.jpg01 फेब्रुवारी : वादग्रस्त ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीचा व्यवहार रद्द झालाय पण याच भूत आता काँग्रेसच्या मानगुटीवर येऊन बसलं आहे. या खरेदी व्यवहार प्रकरणात मध्यस्थी करणारा मिशेल क्रिस्टीयन याच्यावर इटलीमध्ये खटला सुरू आहे. या खटल्याच्या दरम्यान आज (शनिवारी) एक खळबळजनक बाब उघड झालीय. 2008 मध्ये भारतात ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीचे प्रमुख होते, त्यांना मिशेलनं एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात हेलिकॉप्टरची डील पूर्ण व्हावी म्हणून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी संबंधित लोकांशी जवळीक साधावी, असं त्या पत्रात नमूद करण्यात आलं होतं.

या निकटवर्तीय लोकांमध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग, तत्कालीन परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी, त्यावेळचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम के नारायण, काँग्रेस नेते अहमद पटेल आणि वीरप्पा मोईली यांची नावं त्यात घेतली होती. ऑगस्टा हेलिकॉप्टर करार रद्द जरी झाला असला तरी यात खुद्द काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचं नाव आल्यामुळे काँग्रेसला एकच हादरा बसलाय. दरम्यान, ऑगस्टा कराराची चौकशी करणार्‍या सीबीआयच्या सूत्रांनी या पत्र व्यवहाराची दखल घेतलीय. तर हा व्यवहार आता रद्द करण्यात आलेले असल्यानं संबंधित तपासयंत्रणा आता याचा शोध घेईल असं पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी सांगितलंय.

विशेष म्हणजे मागिल महिन्यात 1 जानेवारी रोजी ऑगस्टा हेलिकॉप्टर खरेदीचा व्यवहार रद्द करण्यात आलाय. ऑगस्टा वेस्टलँड कंपनीसोबत अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी तब्बल 3 हजार 600 कोटी मोजून हेलिकॉप्टर्स खरेदी केली जाणार होती. पण या करारामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आल्यामुळे हा करार रद्द करण्यात आला. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असा खुलासा झाल्यामुळे यावरुन वाद रंगण्याची चिन्ह आहे.

काय आहे ऑगस्टा हेलिकॉप्टर खरेदी वाद

ऑगस्टा वेस्टलँड कंपनीसोबत अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी तब्बल 3 हजार 600 कोटी मोजून हेलिकॉप्टर्स खरेदी केली जाणार होती. या करारानुसार ऑगस्टा वेस्टलँड भारतीय हवाई दलाला 12 हेलिकॉप्टर देणार होती. मात्र मागील वर्षी ऑगस्टा वेस्टलँड कंपनीसोबत करार करण्यात यावा यासाठी कंपनीने भारतातील दलालांना 360 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी सीबीआयने माजी हवाई दलप्रमुख एस.पी. त्यागी यांच्याविरोधात गुन्हाही दाखल केला होता. या प्रकरणी संरक्षण मंत्रालय हा करारच रद्द करणार असल्याची बातमी 'द इंडियन एक्स्प्रेस'ने या इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केली होती. अखेर 1 जानेवारी 2014 रोजी हा वादग्रस्त करार आता रद्द करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2014 09:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...