विनाअनुदानित सिलेंडर 107 रुपयांनी स्वस्त

  • Share this:

Image img_221632_gascylender4545_240x180.jpg31 जानेवारी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने कामाचा सपाटा लावलाय. महागाईने वैतागलेल्या जनतेला खुश करण्यासाठी केंद्र सरकारने आता विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात 107 रुपयांनी कपात केली. गुरुवारी अनुदानित सिलेंडरची संख्या 9 वरुन 12 करण्यात आलीय. त्यानंतर आज दुसर्‍या दिवशीच सर्वसामान्यांना दिलासा देत केंद्र सरकारने विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात 107 रुपयांची कपात केलीय. तर दुसरीकडे डिझेलच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलंय. त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणीला सुरूवात केली. लोकसभा निवडणुकीत प्रचाराची धुरा राहुल गांधी यांच्यावर सोपवण्यात आलीय. राहुल गांधींनी काँग्रेसच्या अधिवेशनात प्रचाराचे नारळ फोडले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे सिलेंडरची संख्या 12 करण्यात यावी अशी मागणी केली होती.

आता काँग्रेसच्या उपाध्यक्षांनीच मागणी केल्यामुळे केंद्र सरकार तातडीने कामाला लागले. आठवड्याभरानंतर केंद्रीय पेट्रोलमंत्री विरप्पा मोईली यांनी अपेक्षेप्रमाणे सिलेंडरची संख्या 9 वरुन 12 करण्याची घोषणा केली. 12 सिलेंडरची घोषणा तर केलीच पण त्यासोबत घरगुती सिलेंडरवरची सबसिडी बँकेत जमा करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला. त्यामुळे आता ग्राहकांना केवळ अनुदानित रक्कम भरावी लागणार आहे. अलीकडे केंद्र सरकारने आधार कार्डद्वारे सबसिडी बँकेत जमा करण्याचा निर्णय घेतला होता तो आता मागे घेण्यात आलाय अशी घोषणाही मोईली यांनी केली. त्यामुळे जनतेच्या आणखी रोषाला सामोरं न जाता केंद्र सरकारने आज विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात 107 रुपयांची कपात करुन सर्वसामान्यांना दिलासा दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 31, 2014 09:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...