आंध्रप्रदेश विधानसभेनं तेलंगणा विधेयक फेटाळलं

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 30, 2014 01:21 PM IST

Image img_127092_telangana3_240x180.jpg30 जानेवारी :   स्वतंत्र तेलंगण राज्य निर्माण करण्यासाठी विधानसभेत मांडण्यात आलेले तेलंगणा विधेयक गुरूवारी फेटाळण्यात आले आहे. आवाजी मतदानात हे विधेयक फेटाळण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री किरण रेड्डी यांनी हे विधेयक फेटाळण्याचा प्रस्ताव मांडला होता, तो पारित करण्यात आल्याने हे विधेयक फेटाळण्यात आले.  त्यानंतर विधानसभा अनिश्चित काळालासाठी स्थगित करण्यात आली आहे.

राष्ट्रपतींकडून आलेल्या स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या विधेयकावर चर्चा सुरू होती. मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी ते विधेयक लोकसभेकडे न पाठवता राष्ट्रपतींकडे पाठवण्याचा प्रस्ताव मांडला होता. हे विधेयक मंजूर झाल्यास आपण राजकारणातून संन्यास घेऊ, अशी घोषणा रेड्डी यांनी केली होती. या विधेयकासंदर्भात तीव्र नापसंती व्यक्त करताना रेड्डी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केल्याखेरीज राज्य विधानसभा मत कसे व्यक्त करु शकेल, असा प्रश्‍नही रेड्डी यांनी विचारला.

दरम्यान, सीमांध्र भागातले आमदार यावरून कोर्टात जाण्याची तयारी करत आहेत. तसच तेलुगु देसम पक्षानेही सीमांध्र बंद ची घोषणा केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 30, 2014 12:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...