2002च्या दंगलीला मोदींचं प्रोत्साहन, राहुल गांधींचा आरोप

  • Share this:

rahul gandhi on modi4428 जानेवारी : काँग्रेसच्या केंद्र सरकारने 1984ची शीख दंगल थांबण्याचा प्रयत्न केला होता. 2002च्या गुजरात दंगलींला मोदी सरकारने प्रोत्साहन दिले. त्यासाठी मदतही केली असा गंभीर आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपचे पंतप्रधान उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे.आगामी लोकसभा निवडणुक जशी जवळ येतीये तसा आरोप प्रत्यारोपांना वेग येऊ लागला आहे. एका इंग्रजी न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत राहूल गांधी यांनी गुजरात दंगलीत मोदींचा सहभाग होता असं आरोप केला आहे.

1984च्या शीख दंगलींमध्ये काँग्रेसच्या काही नेत्यांचा हात असण्याची शक्यता आहे, हे मान्य करत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्याबद्दल लोकांची माफी मागीतली आहे. पण मोदींनी अजूनही माफी काही मागितली नाही, असं राहुल गांधी म्हणाले.

त्याचबरोबर, चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी माझ्यावर टाकली जाते. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यास त्याची जबाबदारीही स्विकाराण्यास मी तयार आहे असं राहुल म्हणाले. मात्र या निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होणार असा दावाही त्यांनी यावेळी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2014 10:34 AM IST

ताज्या बातम्या