अखेर केजरीवाल यांचं धरणं आंदोलन मागे

अखेर केजरीवाल यांचं धरणं आंदोलन मागे

  • Share this:

899 kejriwal 3421 जानेवारी : आपचे कायदा सोमनाथ भारती यांच्यासोबत गैरवर्तन करणार्‍या दोषी पोलिसांच्या निलंबनासाठी आप सरकारने पुकारलेलं आंदोलन अखेर मागे घेतलं आहे. दोषी पोलिसांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे, या चारही दोषी पोलिसांची चौकशी केली जाणार आहे अशी घोषणा पोलीस आयुक्तांनी केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर केलं.

सुरक्षित दिल्ली आणि दिल्लीकरांसाठी हे आंदोलन होतं. भ्रष्टाचाराच्या विरोधात हा लढा होता, त्यामुळे हा आपल्या सगळ्यांचा विजय आहे असं केजरीवाल म्हणाले. तसंच दोन दिवसांत दिल्लीकरांचे जे हाल झाले त्याबद्दल केजरीवाल यांनी दिलगिरीही व्यक्त केली.

सर्व कार्यकर्त्यांना शांतपणे घरी जाण्याचं आवाहन केजरीवाल यांनी केलं. दिल्लीच्या थंडीत गेल्या दोन दिवसांपासून रेल भवनाजवळ केजरीवाल, त्यांचे मंत्रिमंडळ आणि त्यांच्या हजारो कार्यकर्त्यासह धरणं आंदोलनासाठी बसले होते. यामुळे चार मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे दिल्लीकरांचे अतोनात हाल झाले. आज मंगळवारी हे आंदोलन आणखी चिघळलं. आपचे कार्यकर्ते आणि पोलीस एकमेकांना भिडले. कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात एक पोलीस शिपाई जखमी झाला. कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी बॅरिकेडस् तोडले आणि आत घुसण्याचा प्रयत्न केलाय.

त्यामुळे पोलिसांच्या संयमाचा बांध फुटला. पोलिसांनी जमावाला रोखण्यासाठी लाठीमार केलाय. पोलिसांनी केलेल्या लाठीमारात 8 जण जखमी झालेत. आपच्या कार्यकर्त्यांनी एका पत्रकाराला धक्काबुक्कीही केली. संध्याकाळी पत्रकार भवनात आपच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी नायब राज्यपाल नजीब जंग यांनी पोलिसांची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं. या चारही पोलिसांना आता सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे या निर्णयानंतर केजरीवाल यांनी आपलं आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.

First published: January 21, 2014, 8:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading