आंदोलनाची जागा ठरवणारे 'ते' कोण? -केजरीवाल

आंदोलनाची जागा ठरवणारे 'ते' कोण? -केजरीवाल

  • Share this:

kejriw barri21 जानेवारी :  ''मी दिल्लीचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे आंदोलन कोठे करावे, हे सांगणारे 'ते' कोण?,'' असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद  केजरीवालांनी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना जाब विचारलं. दिल्ली पोलीस आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातला वाद आज दुसर्‍या दिवशी चांगलाच चिघळला आहे.

दिल्लीतील 4 पोलिसांवर निलंबनाची कारवाई व्हावी यासाठी खुद्द दिल्लीचे मुख्यमंत्री रस्त्यावर उतरले आहेत. हा संघर्ष काल रात्रीही सुरूच होता तर आज सकाळी त्यांनी रेल भवनाबाहेर लावलेले बॅरिकेड्स जबरदस्तीने हटवण्याचा प्रयत्न केला. आपल्या आणखी काही समर्थकांना रेलभवन परिसरात येऊ द्यावे यासाठी केजरीवाल यांनी हा प्रयत्न केला. गृहमंत्री शिंदे यांनी केजरीवाल यांना आंदोलन जंतर मंतर येथे करण्यास सांगितले होते. केजरीवाल यांनी आपले मंत्री व समर्थकांसह रात्र ही रस्त्यावरच काढली. अरविंद केजरीवाल यांची समजूत घालण्याचे केंद्र सरकारचे सर्व प्रयत्न फोल ठरलेत.

केजरीवालांनी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि दिल्ली पोलिसांवरही हल्ला चढवला. मी दिल्लीचा मुख्यमंत्री आहे. मी कुठे बसून आंदोलन करायचं आणि कुठे नाही हे सांगणारे 'ते' कोण? असा जाब विचारला. शिंदे यांनी भारतीयांविरोधात युद्ध पुकारल्याचा तसंच ते स्वत:ला दिल्लीचे मुख्यमंत्री समजू लागल्याचा आरोप त्यांनी केला. रेलभवन परिसरात मूलभूत सुविधाही पुरवल्या नसल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे.

आज सकाळी पुन्हा एकदा केजरीवाल यांनी गृहमंत्र्यांना इशारा देत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत शिंदे यांना झोपू देणार नाही, हे म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनी केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांचा ताफा सोमवारी रेल भवनाजवळच अडविला होता. त्यामुळे केजरीवाल यांनी त्याठिकाणीच आंदोलनाला सुरवात केली होती. केजरीवाल यांनी आपण दहा दिवसांच्या आंदोलनाची तयारी करून आल्याचे स्पष्ट केले होते. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात जर अडथळा आला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आंदोलनाची जागा 

केजरीवाल यांनी आंदोलनासाठी जी जागा निवडली आहे, ती मध्य दिल्ली व केंद्र सरकारच्याच दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. आंदोलन सुरू असलेल्या रायसीना रस्त्यावरील गोविंद पार्क येथे अत्यंत महत्त्वाचे आठ रस्ते येऊन मिळतात. तेथून अत्यंत महत्त्वाची मंत्रालये जवळच आहेत. येथेच वाहतूक कोंडी झाल्यामुळे सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले. जोडीला चार मेट्रो स्थानके बंद झाल्याने लोकांच्या हालात भरच पडली व सामान्यांनी आपच्या आंदोलनाविरुद्ध तक्रारीचा सूर काढण्यास सुरवात केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2014 10:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading