दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचं धरणं आंदोलन

  • Share this:

Image img_225922_kejriwalondelhigangrape_240x180.jpg20 जानेवारी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज सोमवारी गृहमंत्रालयाच्या नॉर्थ ब्लॉकबाहेर धरणं आंदोलन करणार असल्याने दिल्लीतील चार मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या तीन अधिकार्‍यांविरोधात कारवाई व्हावी या मागणीसाठी हे धरणं आंदोलन करण्यात आले आहे. केजरीवाल यांना रेल भवनाजवळ थांबवण्यात आलं आहे.या आंदोलनात केजरीवाल यांच्यासोबत त्यांचे सहा मंत्रीही सहभागी होणार आहेत.

केजरीवाल गृहमंत्रालयासमोर तर त्यांचे सर्व आमदार आणि कार्यकर्ते जंतरमंतरवर धरणं आंदोलन करणार आहेत. दिल्ली सरकारमधील दोन मंत्री सोमनाथ भारती, राखी बिर्ला आणि पोलीस यांच्यात छापा टाकण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन दिल्ली पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप करून त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. पोलिसांचं निलंबन होणार नसेल तर त्यांची बदली करण्यात यावी असं केजरीवाल यांनी म्हटले आहे.

केजरीवालांच्या धरणं आंदोलनामुळे दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक आणि इंडिया गेटकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत तर दुपारी चार वाजेपर्यंत काही मेट्रो स्टेशन्सही बंद ठेवण्यात आले आहेत. त्याशिवाय गृहमंत्रालय परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.  केजरीवाल यांना कारसहित हलवण्यासाठी ट्रॅफिकची क्रेनही सज्ज आहे तर आंदोलन चिघळल्यास आंदोलकांना आटोक्यात आणण्यासाठी रेलभवनजवळ पाण्याचे फवारे मारण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 20, 2014 11:22 AM IST

ताज्या बातम्या