राहुल यांच्या नेतृत्वाखाली यश मिळेल -पंतप्रधान

राहुल यांच्या नेतृत्वाखाली यश मिळेल -पंतप्रधान

  • Share this:

pm on terror attack17 जानेवारी :  राहुल यांच्या नेतृत्त्वाखाली होणार्‍या निवडणुकीत आम्हांला निश्चितच यश मिळेल याचा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. दिल्लीतील काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान मनमोहन सिंग बोलत होते.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे निराश होऊ नका, हार का झाली त्यावर चिंतन करण्याची गरज आहे. देशात स्थिर सरकार येण्याची गरज आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्त्व फक्त काँग्रेसकडेच आहे. सरकारी निर्णयप्रक्रियेत आम्ही जितकी पारदर्शकता आणली तितकं कुठल्याच सरकारनं आणलेली नाहीये असं ही ते म्हणाले.

2011 मध्ये आर्थिक मंदी येऊनही आपण चांगला विकास दर कायम राखण्यात यशस्वी ठरलो आहोत. त्याच बरोबर महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही मजबूत कायदे केले. कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ टाळण्यासाठी कायदा आणला. गरिबी कमी होण्याचा सर्वाधिक वेग काँग्रेसच्याच कारकिर्दीत झाला.

स्पेक्ट्रम वाटप आणि कोळसा घोटाळा प्रकरणाची कायद्यानुसार चौकशी होईल. फक्त काँग्रेसच आधुनिक, प्रगतीशील आणि समृद्ध भारताची निर्मिती करू शकण्याची क्षमता फक्त काँग्रेसमध्येच असल्याचंही ते म्हणाले.काँग्रेसची विचारसरणी धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक आहे. विरोधी पक्षांचा जातीयवादी चेहरा ओळखा, भाजप आणि मोदींचं नाव न घेता पंतप्रधानांची मोदींवर टीका केली. विरोधी पक्षांनी केलेल्या दाव्यांवर डोळे झोकून विश्वास ठेवू नका, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

First published: January 17, 2014, 3:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading