लोकसभा निवडणुकीत प्रचाराची धुरा राहुल गांधींकडे

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 16, 2014 09:17 PM IST

Image rahul_gandhi_300x255.jpg16 जानेवारी : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी उभे राहतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती आता या चर्चेला काँग्रेसने पुर्णविराम दिलाय. आज दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली.

या बैठकीत राहुल गांधी हे काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नसणार हे काँग्रेसने स्पष्ट केलंय. खुद्द पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांचं नाव घोषित करायला विरोध केलाय. मात्र राहुल गांधी लोकसभा निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळणार आहे. यावर काँग्रेसच्या नेत्यांनी एकमताने होकार दर्शवला आहे.

उद्या शुक्रवारी एआयसीसीच्या बैठकीत याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे. या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधी यांचं नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावं अशी मागणी केली होती. पण निवडणुकीच्या अगोदर पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करणे ही आपल्या पक्षाची परंपरा नाही असं स्पष्ट शब्दात सोनिया गांधींनी ठणकावून सांगितलं. भाजपने जरी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला असला तरी आम्ही का करावा ? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी उपस्थित केला.

दरम्यान, काँग्रेसमध्ये बदलाची वेळ आता आलीय. ज्यांना राहुल गांधी चालणार नाही, त्यांना पक्षातूनच जावं लागेल, असा स्पष्ट इशारा परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी आयबीएन नेटवर्कशी बोलताना दिलाय. तर काँग्रेस पक्ष निवडणुकीत हरणारच आहे, हे काँग्रेसलाही माहीत आहे आणि म्हणूनच राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलं नाही, अशी टीका भाजपनं केलीय. एकंदरीतच येण्यार्‍या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असा सामना रंगणार या चर्चेवर आता पडदा पडलाय.

Loading...

राहुल गांधी यांच्या काँग्रेसमधल्या आतापर्यंतच्या प्रवास

मार्च 2004 - राजकारणात प्रवेश, अमेठीतून निवडणूक लढवली

सप्टेंबर 2007 - सरचिटणीस म्हणून नियुक्ती, युवक काँग्रेस आणि एनएसयूआयची जबाबदारी

नोव्हेंबर 2008 - राहुलकडून आयवायसीचे थिंकटँकसाठी 40 जणांची निवड

मे 2009 - उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीचा प्रचार, 21 जागांवर काँग्रेसचा विजय

जानेवारी 2013 - जयपूरमधल्या परिषदेत काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती

सप्टेंबर 2013 - दोषी लोकप्रतिनिधींना संरक्षण देणारा वटहुकूम घेण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाला भाग पाडलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2014 08:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...