संघानेही घेतला 'आप'चा धसका

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 9, 2014 10:26 PM IST

Image img_230192_sangh3452345_240x180.jpg09 जानेवारी : आम आदमी पार्टीच्या यशाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंही गांभीर्याने दखल घेतलीय. तीन राज्यांतल्या यशानं हुरळून जाऊन नका, 'आप'कडून धडा घ्या आणि आपल्या कार्यशैलीत बदल करा असा सूचनावजा सल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपला दिलाय.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी संघाची हैदराबादमध्ये दोन दिवसांची बैठक झाली. त्याला भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह, माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, रामलाल उपस्थित होते. भाजपनं अधिक सर्वसमावेशक व्हायला पाहिजे, असंही भागवत यांनी म्हटलं आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिका जागा जिंकूनही सत्ता स्थापन करू शकले नाही. 'आप'ने पहिल्याचं निवडणुकीत 28 जागा जिंकून आपली दखल घेण्यास भाग पाडलंय. आपच्या धसक्यामुळे इतर पक्षांनी आपल्या अजेंड्यात फेरबदल करण्यात सुरुवात केलीय. याला काँग्रेसही अपवाद नाही. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर स्वत: मैदानात उतरुन लोकपाल विधेयकाचा मार्गा मोकळा करुन दिला. काँग्रेस भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे असा संदेश देण्याचा प्रयत्न काँग्रेसने या निमित्ताने केला.

Loading...

तर दिल्लीच्या यशानंतर 'आप'ने देशभरात लोकसभेसाठी जास्तीत जास्त जागांवर निवडणुका लढवणार असल्याचं जाहीर केलंय. एव्हान महाराष्ट्रात आपचे नेते भाजप नेत्यांना टार्गेट करत आहे. आपचे नेते कुमार विश्वास यांनी तर नरेंद्र मोदींच्या विरोधात उभं राहण्याची तयारी दाखवलीय. तर अंजली दमानिया यांनी महाराष्ट्रात नितीन गडकरी यांच्या विरोधात उभं राहण्याची शक्यता आहे. भाजप येणार्‍या निवडणुकीत कोणतही 'रिस्क' घेण्याच्या तयारीत नाही. त्यामुळेच पुन्हा एकदा संघाची मात्रा इथंही लागू झालीय. खुद्द सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपला 'दक्ष' राहण्याचे आदेश दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2014 10:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...