S M L

कोलकाता डबल गँगरेप प्रकरणाला नवीन वळण

Samruddha Bhambure | Updated On: Jan 2, 2014 02:17 PM IST

Image img_236342_delhirapegandhingar_240x180.jpg02 जानेवारी : कोलकाता डबल गँगरेप प्रकरणात काल ज्या पीडितेचा मृत्यू झाला तिने स्वतःला पेटवून घेतले नाही, तर तिला पेटवून देण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या पीडितेने मृत्यूपूर्वी दिलेल्या जबानीच्या आधारे पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

रतन सिल आणि मिंता सिल या दोघांच्या विरोधात पोलिसांनी आता खुनाचा गुन्हा दाखल केलाय. या मुलीने तक्रार मागे घेण्यास नकार दिल्यानंतर या दोघांनी तिच्या अंगावर केरोसिन ओतून तिला पेटवून दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या आरोपींनी या मुलीवर दोनदा बलात्कार केला होता. तर या पीडित मुलीला योग्य उपचार मिळाले नाहीत, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय. तिच्या वडिलांनी पश्चिम बंगालच्या आरोग्य खात्याचा कार्यभार सांभाळणार्‍या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात तक्रार केलीय.


या अल्पवायीन मुलीवर 26 ऑक्टोबरला 6 नराधमांनी अत्याचार केला. या प्रकरणी6 आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पण आरोपीचे गुंड या मुलीला खटला मागे घेण्यासाठी सतत धमक्या देत होते. यालाच कंटाळून या मुलीने 23 डिसेंबरला स्वत:ला जाळून घेतल्याच सांगण्यात आलं होतं. या सगळ्या प्रकरणाविरोधात आता सगळीकडे संताप व्यक्त होत आहे.आणि प्रकरणा विरोधात लोक आता रस्त्यावर उतरले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 2, 2014 12:14 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close