कसाबला फाशी द्या - कविता करकरे

कसाबला फाशी द्या - कविता करकरे

17 फेब्रुवारी , मुंबई मुंबईवर हल्ला करणारा पाकिस्तानी अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याला फाशी द्यावी अशी मागणी शहीद हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांनी केलीये मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कविता करकरे यांनी ही मागणी केलीये. मुंबई हल्ल्याचा खटला तातडीनं चालवावा. यात उशीर होणं हे देशासाठी घातक ठरेल असं करकरेंचं म्हणणं आहे. शहीद पोलीस इन्स्पेक्टर शशांक शिंदे यांच्या हौतात्म्याचा उचित सन्मान झाला नाही याबद्दल कविता करकरे यांनी खंत व्यक्त केलीय. पोलिसांना पुरेशी शस्त्रं, त्यांना चांगला पगार मिळावा अशी मागणी कविता करकरे यांनी केलीय. पोलिसांच्या मुलांना योग्य शिक्षण मिळावं, पोलिसांच्या कामाच्या वेळा कमी कराव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीये. आयबीएन - लोकमतनं कविता करकरे यांची मुलाखत घेतली होती. " कसाबला फाशी देऊ नका तर त्याला सुधारण्याची एकतरी संधी द्या हे माझ्या मुलीनं सांगितलं आहे, असं कविता करकरे यांनी सांगितलं होतं. पण अनेकांना ते मत कविता करकरेंचं वाटलं होतं. पण तसं कविता करकरेचं मत नव्हतं. त्याबाबत कविता करकरे सांगतात, " आयबीएन - लोकमतनं माझा जेव्हा इंटरव्ह्यू घेतला होता. तेव्हा मी बरीच दु:खात होते. कसाबला सुधारण्याची संधी द्या हे मी म्हटलेलं नसून माझ्या मुलीनं म्हटलेलं आहे. कसावर कारवाई करा, असं माझं मत आहे. त्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. "

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 17, 2009 05:21 PM IST

ताज्या बातम्या