जादूटोणाविरोधी विधेयक विधान परिषदेमध्ये मंजूर

जादूटोणाविरोधी विधेयक विधान परिषदेमध्ये मंजूर

  • Share this:

jadutona18 डिसेंबर : जादूटोणाविरोधी विधेयक आज विधान परिषदेमध्ये मंजूर झालंय. यामुळे आता महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा लागू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. विधानपरिषदेत दोन दिवसांच्या चर्चेनंतर विधेयकाला मंजुरी मिळाली. विधानसभेनं शुक्रवारीच या विधेयकावर मोहोर उमटवली होती. हे विधेयक मंजूर करुण  डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना खरी श्रद्धांजली दिलीय. देशात अशा प्रकारचा कायदा करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलंय.

 

18 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर करण्याचा ऐतिहासिक निर्णय विधान परिषदेत घेण्यात आलाय.  शिवसेनेच्या विरोध डावलून विधेयकाला  मंजुरी मिळालीय. आता हे विधेयक सोमवारी विधान परिषदेत मांडलं जाणार आहे. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी तब्बल 18 वर्ष ज्या जादूटोणाविरोधी विधेयकासाठी लढा दिला ते विधेयक आता कायदेशीररित्या अस्तित्वात येत आहे. याचा पहिला टप्पा अगोदर राज्य सरकारने वटहुकूम काढून पूर्ण केला. मात्र जादूटोणाविरोधी विधेयकावर कायदेशीर शिक्कामोर्तब करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडले जाईल असं राज्य सरकारने स्पष्ट केलं होतं.

 

अखेर ठरल्याप्रमाणे हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात आलं. पण या विधेयकावर अपेक्षेप्रमाणे सेना-भाजपनं आपला खरा रंग दाखवला. एखाद्या दुसर्‍या मुद्यावर आक्षेप घेत, विरोधक विधेयकाच्या संमतीसाठी सरकारची कोंडी केली. शिवसेनेनं विरोधकाला कडाडून विरोध केलाय.  एवढंच नाही, तर या विधेयकासाठी झटणार्‍या डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि शाम मानव यांच्यावरसुद्धा शिवसेनेनं चिखलफेक केली. विधानपरिषदेत दोन दिवसांच्या चर्चेनंतर विधेयकाला मंजुरी मिळाली.

 

पण आता  दोन दिवसांच्या चर्चेनंतर आज विधान परिषदेत विधेयकाला मंजुरी मिळाली आणि अखेर खर्‍या अर्थाने जादूटोणाविरोधी कायदा संपूर्ण राज्यात अस्तित्वात आला आहे.

 

First published: December 18, 2013, 10:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading