रामदेवबाबांवरील गुन्हे काँग्रेसचे कारस्थान - मोदी

रामदेवबाबांवरील गुन्हे काँग्रेसचे कारस्थान - मोदी

  • Share this:

narendra modi15 डिसेंबर : योगगुरु रामदेव बाबा यांच्यावर काँग्रेसमुळेच गुन्हे दाखल झाले आहे. मात्र रामदेव बाबांवर गुन्हे दाखल करण्यामागे जेवढी शक्ती काँग्रेसने खर्च केली. तेवढी शक्ती उत्तराखंडमधील प्रलयग्रस्तांसाठी खर्च केली असती तर प्रलयग्रस्तांचे जीवन चांगले होऊ शकले असते असे सांगत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

डेहराडूनमध्ये रविवारी नरेंद्र मोदींनी जाहीर सभा घेत काँग्रेस सरकारवर पुन्हा एकदा टीकेची तोफ डागली. हिंदू धर्मीयांसाठी पवित्रस्थळ असलेल्या उत्तराखंडमध्ये पर्यटनाला भरपूर वाव आहे. त्यादृष्टीने या राज्याला रेल्वेने देशाच्या प्रत्येक राज्याशी जोडायला हवे. मुस्लिमांचे धर्मस्थळा असलेल्या मक्काप्रमाणेच आपण उत्तराखंडचा विकास करायला हवे असे मोदींनी सांगितले.

उत्तराखंडमध्ये मुबलक पाणी असून यातून वीजनिर्मिती शक्य आहे. मात्र याकडे काँग्रेसने दुर्लक्ष केले. देशातील जनता गरीब राहावी असे काँग्रेसला वाटते असा आरोपही त्यांनी केला.

First published: December 15, 2013, 6:58 PM IST

ताज्या बातम्या