चारा घोटाळ्याप्रकरणी लालूंना जामीन मंजूर

चारा घोटाळ्याप्रकरणी लालूंना जामीन मंजूर

  • Share this:

Image img_192772_laluprasadyadav_240x180.jpg13 डिसेंबर : चारा घोटाळ्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा भोगत असलेले माजी रेल्वेमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर करून मोठा दिलासा दिला आहे.

1996 मध्ये बिहार येथे हा घोटाळा उघडकीस आला होता. लालूप्रसाद यांच्यावर सरकारी तिजोरीतून 37.7 काटी रुपये बेकायदेशीरपणे काढल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

याप्रकरणी लालूप्रसाद यांच्या सोबत आणखीन 44 जणांना सीबीआयच्या विशेष कोर्टाने 3 ऑक्टोबरला पाच वर्षांच्या कोठडीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लालूप्रसाद दोन महिन्यांपासून तुरुंगात होते. 44जणांपैकी 37 जणांना जामीन मंजूर झाला असून बाकीच्या सहा जणांच्या जामीन अर्जांवर विचार करत असल्याचे जेष्ठ वकील राम जेठमलानी यांनी न्यायालयाला सांगितले.

दरम्यान, लालूप्रसाद जरी निवडणूक लढवू शकत नसले तरी ते त्यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा प्रचार करतील आणि त्यामुळे पक्षाला यश मिळेल अशी प्रतिक्रिया त्यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी दिली आहे.

First published: December 13, 2013, 3:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading