महिलेवर बलात्कार केल्याची नारायण साईची कबुली

महिलेवर बलात्कार केल्याची नारायण साईची कबुली

  • Share this:

naryan sai11 डिसेंबर : सुरतमध्ये महिलेवर बलात्कार केल्याची कबुली आसाराम बापूचा मुलगा नारायण साईनं दिली आहे अशी माहिती सुरत पोलिसांनी दिलीय. तसंच इतर 8 महिला अनुयायांशीही संबंध असल्याचंही साईनं मान्य केलं आहे असंही पोलिसांनी सांगितलंय.

साईची आज पोलीस कोठडी पूर्ण होणार आहे. आता साईला कोर्टात हजर केले जाणार आहे. सुरत पोलीस आयुक्त राकेश अस्थाना माहिती दिली की, साई अगोदर सगळी हकीकत सांगण्यास टाळाटाळ करत होता. मात्र पीडित महिला आणि साईची समोरासमोर चौकशी केल्यानंतर साई पोपटासारखा बोलायला लागला. आपल्या पत्नीला मुलं होत नसल्यामुळे पीडित महिलेशी संबंध ठेवले होते. यासाठी 15 ते 20 लोकांनी आपली मदत केली. तसंच पीडित महिलेचा मुलगा हा आपला मुलगा असल्याचंही साईने कबूल केलंय.

चौकशी दरम्यान साई आपला बचावही करत होता. पीडित महिलेच्या नातेवाईकांच्या सहमतीने संबंध ठेवले असा बनावही साईने रचला. चौकशीत साईकडून 7 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे. तसंच त्याने आणखी 8 महिलांशी संबंध असल्याचंही कबूल केलं. या आठ महिलांपैकी काही महिला या आश्रमातील होत्या तर काही बाहेरच्या होत्या. सुरतमध्ये दोन पीडित तरूणींनी साई विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 58 दिवस नारायण साई फरार होता. या काळात साई याला मदत करणार्‍या विष्णु आणि अर्जुन या दोन व्यक्तींना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आता साईने कबुली दिल्यामुळे त्याच्यविरोधात आपल्याजवळ ठोस पुरावे असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

First published: December 11, 2013, 5:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading