दिल्लीत सत्ता स्थापनेचा तिढा कायम

दिल्लीत सत्ता स्थापनेचा तिढा कायम

  • Share this:

delhi kejriwal and harshvardhan10 डिसेंबर : दिल्लीत सरकार कोण स्थापन करणार याबद्दलचा तिढा अजूनही सुटला नाही. एकीकडे आम आदमी पार्टीची समिती पर्यायांचा विचार करण्यासाठी बैठक घेत आहेत. दिल्लीकरांना पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागू नये यासाठी कोणकोणते पर्याय असू शकतात यावर या बैठकीत चर्चा झाली. तर दुसरीकडे भाजपला काही मुद्यांवर पाठिंबा देण्याची सूचना आम आदमी पार्टीनं फेटाळून लावली आहे.

दुसरीकडे आम आदमी पार्टीच्या खेळीमुळे दिल्लीत सरकार स्थापन करणं भाजपलाही कठीण होऊन बसलंय. आपल्याकडे सत्ता  स्थापनेसाठी पुरेशा जागा नाही आणि आपण उमेदवारांची जमावाजमव करण्यासाठी घोडेबाजारही करणार नाही, असं भाजपने स्पष्ट केलं.

तर आपण विरोधी पक्षात बसणं पसंत करू आणि पुन्हा निवडणुकांसाठीसुद्धा तयार आहोत, असं योगेंद्र यादव यांनी स्पष्ट केलंय. दिल्लीत जेडीयूचा एक उमेदवार निवडून आलाय. त्यांनी आम आदमी पार्टीला पाठिंबा देऊ केलाय. पण, केवळ एका आमदाराच्या पाठिंब्यानं आम आदमी पार्टी सरकार स्थापन करू शकणार नाहीय.

या पार्श्वभूमीवर आता दिल्लीमध्ये लोकपालचा विषयही तापताना दिसतोय. अण्णांनी राळेगणमध्ये आज आंदोलनाला सुरुवात केली आहे. तर आपण नेहमीच जनलोकपाल विधेयक आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असं भाजपनं म्हटलं आहे. हा मुद्दा जरी आम आदमी पार्टीच्या जाहीरनाम्याावर असला तरी भाजप नेहमीच भ्रष्टाचाराच्या विरोधात राहिलंय, असंही भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलंय.

First published: December 10, 2013, 4:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading