'हाता'ला मिझोरमचा आधार, सत्ता कायम

'हाता'ला मिझोरमचा आधार, सत्ता कायम

  • Share this:

mizoram_election win09 डिसेंबर : चार राज्यात 'हात'ची सफाई झाल्यानंतर काँग्रेससाठी मिझोरम 'काडीचा आधार' ठरला आहे. मिझोरम विधानसभेत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे काँग्रेसने मिझोरमचा गड कायम राखलाय.

मिझोरम विधानसभेत 40 जागांसाठी इथं मतमोजणी सुरू आहे. इथं काँग्रेसला 40 पैकी 29 जागांवर विजय मिळाला आहे. अजून काँग्रेस तीन जागांवर आघाडीवर आहे. इथं बहुमतसाठी 21 जागांची गरज होती. काँग्रेसने 29 जागा जिंकून एकहाती सत्ता राखली आहे.

काँग्रेस विरोधात उभे असलेल्या एमडीए पक्षाला 4 जागांवरच समाधान मानावे लागले आहे. यामुळे विद्यमान मुख्यमंत्री लाल थान्हावाल हे आता दुसर्‍यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. रविवारी दिल्ली, राजस्थान,मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या चार राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागला होता. या चारही राज्यात काँग्रेसचा 'सफाया' झालाय.

दिल्लीमध्ये तर दुहेरी जागांचा आकडाही गाठता आला नाही. तर राजस्थानमध्ये भाजपच्या वादळात काँग्रेस जमीनदोस्त झाले. मध्यप्रदेशमध्येही शिवराज सिंह चौहान यांनी हॅट्ट्रिक साधत काँग्रेसला जवळही भटकू दिले नाही. मात्र पाच राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये मिझोरम या एकमेव राज्यात काँग्रेस पक्ष विजयी झाला असून पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बर्थडे गिफ्ट ठरले आहे.

First published: December 9, 2013, 7:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading