दिल्लीत काँग्रेसचा 'सफाया', शीला दीक्षितांचा राजीनामा

दिल्लीत काँग्रेसचा 'सफाया', शीला दीक्षितांचा राजीनामा

  • Share this:

shila dixit08 डिसेंबर : दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. पराभवाची जबाबदारी स्विकारुन शीला दीक्षित यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.

दीक्षित यांनी पराभव मान्य केला आणि दिल्लीकरांचे आभार मानले. या निवडणुकीत शीला दीक्षित यांचा आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी तब्बल 22 हजार मतांनी पराभव केला. दीक्षित यांच्या पारड्यात फक्त 8 हजार मत पडली. मात्र 8 हजार 909 मतांवर पिछाडीमुळे आपला पराभव दिसत असताना दीक्षित यांनी राजीनाम्याची घोषणा केली.

त्यांच्याविरोधात उभे असलेले केजरीवाल तेंव्हा 10 हजार 438 मतांनी आघाडीवर होते. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासून केजरीवाल यांनी आघाडी घेतली होती. ती अखेर कायम राहिली आणि विजयात रुपांतरीत झाली. केजरीवाल यांच्या विजयामुळे आम आदमीने दमदार पदार्पण केलंय.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 33 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. काँग्रेसला फक्त 8 जागा मिळाल्या आहे. आजपर्यंतचा काँग्रेसचा हा सर्वात मोठा पराभव समजला जात आहे. तर नव्याने राजकारणाच्या आखाड्यात उतरलेल्या आम आदमी पार्टीने धडाकेबाज एंट्री केलीय. भाजपला टक्कर देत आम आदमीने 27 जागांवर आघाडीवर आहे. आम आदमीचा हा मोठा विजय झालाय. भाजपचे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फटाके फोडून आनंद साजरा करत आहे. तर आम आदमीचे कार्यकर्तेही जल्लोषासाठी रस्त्यावर उतरले आहे.

First published: December 8, 2013, 12:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading