पुढचं नाट्यसम्मेलन न्यू जर्सीत - मोहन जोशी

14 फेब्रुवारी, बीड अजय परचुरे, माधव सावरगावे बीड नगरीत 89 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसम्मेलनाचा शुभारंभ झाला. सकाळी कै. केशरबाई क्षीरसागर नाट्यनगरीत नाट्यसम्मेलनाचे अध्यक्ष रामदास कामत आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मंत्री मोहदयांच्या उपस्थितीत नाट्यसम्मेलनाला सुरुवात झाली ती नाट्यदिंडीनं. मावळते नाट्यसम्मेलनाध्यक्ष रमेश देव यांनी अध्यक्षपदाची सूत्रे रामदास कामत यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी पुढचं नाट्य सम्मेलन आम्ही न्यू जर्सीत घेऊ , अशी घोषणा नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी केली. नाट्यसम्मेलनाच्या निमित्तानं बीड शहरानं उत्साहाची झुल पांघरली होती. नाट्यदिंडीचा सोहळा पाहण्यासाठी समस्त बीडवासी जमले होते. या नाट्यदिंडीला नाट्यसम्मेलानाध्यक्ष रामदास कामत, नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, ज्येष्ठ कलावंत दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, स्मिता तळवळकर, नीलम शिर्के, मकरंद अनासपुरे, भार्गवी चिरमुले हे कलाकार मंडळी उपस्थित होती. वनमंत्री बबनराव पाचपुते, सार्वजनिक बांधकाममंत्री डॉ.विमल मुंदडा, सांस्कृतिक कार्यमंत्री सुरेश वरपुडकर या नेते मंडळींची उपस्थितीही बीड वासियांना सुखावून गेली. 89 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं बीडमध्ये दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शनही भरलं आहे. 1916 ते आतापर्यंतची नाट्यपरंपरा अखिल भारतीय नाट्यसंमेलनात छायाचित्ररूपाने पाहायला मिळणार आहे. शम्मी कपूर, पृथ्वीराज कपूर आदी कलाकारांचे तसेच संगीत नाट्यपरंपरेतील मैलाचा दगड असणार्‍या महत्त्वाच्या नाटकांचे दुर्मीळ फोटो याठिकाणी पाहायला मिळणारेत. के.टी.देशमुख यांनी 1916ते 1970पर्यंतच्या या छायाचित्रांचा ठेवा जपून ठेवला होता. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारने 1995मध्ये ही सर्व छायाचित्र विकत घेतली होती. सध्या महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संस्थेच्या वतीने ती प्रदर्शित करण्यात आलीयत. मराठवाड्यात भरलेल्या या चौथ्या नाट्य सम्मेलनात भरलेलं हे फोटो प्रदर्शन बहुतेक नाट्यरसिकांना सुखावून गेलं आहे. सम्मेलनाच्या पूर्वसंध्येलाच अशी अनोखी मेजवानी नाट्यरसिकांना मिळाल्यानं सम्मेलनाला आल्याचं समाधान नाट्यरसिकांनी व्यक्त केलं आहे.

  • Share this:

First published: February 14, 2009, 9:38 AM IST
Tags:

ताज्या बातम्या