'370' पेक्षा भाजप आणि संघ यावर चर्चा करावी -दिग्विजय सिंग

  • Share this:

digi on modi02 डिसेंबर : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणार्‍या 370 व्या कलमावर चर्चाच करायची असेल तर भाजप आणि राष्ट्रीय स्वंय संघ यावर चर्चा करावी अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी केली. जम्मू इथं झालेल्या सभेत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी कलम 370 बद्दल केलेल्या वक्तव्यावरून चांगलाच वाद पेटलाय.

काश्मीरला विशेष दर्जा देणार्‍या कलम 370 चा काश्मीरच्या जनतेला काय फायदा झाला आणि या कलमाची गरज आता आहे का असं नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं. याआधीही भाजपने कलम 370 रद्द करण्याची मागणी लावून धरली होती. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी कलम 370 काही काळानंतर काढून घ्यावं, असं म्हटलं होतं याचीही आठवण मोदींनी करून दिली.

घटनातज्ज्ञांनी कलम 370 च्या उपयोगाबद्दल चर्चा घडवून आणावी, असंही मोदी म्हणाले होते. या वादावर भाजपच्या नेत्यांनी मोदींची बाजू घेतलीय. 370 कलमाचा जम्मूवासीयांना किती फायदा झाला याबद्दल मोदी विचारत होते. कारण तिथे इतक्या मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार आहे, सुशासनाचा अभाव आहे. तिथे अजूनही मागसवर्गीयांना मंडल आयोगाचा फायदा होत नाहीय अशी भूमिका भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी मांडली. तर या कलमावर चर्चाच करायची असेल तर भाजप आणि राष्ट्रीय स्वंय संघ यावर चर्चा करावी अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी केली. तसंच स्वातंत्र्यानंतर जम्मू आणि काश्मीर मधील जनतेला सरकारकडून कोणत्याही बाबतीत कमी पडू दिलं नाही असा दावाही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2013 07:15 PM IST

ताज्या बातम्या