रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशा

13 फेब्रुवारी, नवी दिल्ली लालूंनी अंतरिम रेल्वे बजेट सादर केलं. आपल्या जादूई पोतडीतून लालूंनी दरवर्षीप्रमाणेच अनेक योजना बाहेर काढल्यायत. पण महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र विशेष काही मिळालं नाही. अमरावतीसाठी आता दररोज रेल्वेगाडी धावणारेय. सध्या ही गाडी आठवड्यातून तीन दिवस असते. येत्या एप्रिलपर्यंत 12 ऐवजी 16 डब्यांच्या रेल्वेगाड्या धावणारेयत. तसंच रेल्वेच्या एसी भाड्यातही दोन टक्के कपात होईल. माल भाड्यात लालूंनी कुठलीही दर वाढ केलेली नाही. मालगाडीची क्षमताही 22 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय लालूंनी घेतलाय. तसंच डबलडेकर मालगाडी चालू करण्याची योजनाही रेल्वेच्या आगामी प्रकल्पात आहे. ठाणे आणि भागलपूरसाठी नवीन रेल्वे विभाग सुरू करणार असल्याची घोषणाही लालूंनी केलीय. येत्या वर्षात 43 नव्या रेल्वे गाड्यांची घोषणा लालू करणारेयत. तर देशभरात 1100 किलोमीटरच्या नवीन रेल्वे लाईन्स टाकण्यात येणार आहेत. मुंबई-कारवार रेल्वे आता आठवड्यातून 3 दिवस धावणारेय. रेल्वेमधल्या सोयी वाढवण्यासाठी येत्या वर्षात 35 हजार 900 कोटींची गुंतवणूक करण्यात येईल. पॅसेंजर ट्रेनची क्षमताही 33 टक्क्यांनी वाढवण्यात येणारेय. रेल्वे कर्मचार्‍यांच्या हिताच्या दृष्टीनंही लालूंनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. 4 हजार 500 कोटींवरून पेन्शनसाठीची तरतूद लालूंनी 10 हजार 500 कोटींवर नेली आहे. रेल्वेच्या 14 लाख कर्मचार्‍यांना याचा फायदा होणारेय. रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांनी पुन्हा महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसलीत. रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राची उपेक्षा केलीय. मुंबई अमरावती एक्स्प्रेस ट्रेनच्या फेर्‍या वाढवणं, मुंबई-कारवार ही नवी ट्रेन आठवड्यातून तीनदा सुरू करणं याशिवाय महाराष्ट्राच्या वाट्याला काही आलेलं नाही. मुंबईतल्या लोकल ट्रेन सेवेला त्यांनी काहीही दिलेलं नाही. ट्रेनच्या भाड्यात वाढ झालेली नाही. पण नव्या काहीही सुविधा वा योजना जाहीर करण्यात आलेली नाही. राज्याला एका किलोमीटरचाही नवा रेल्वे मार्ग देण्यात आलेला नाही. नव्या रेल्वे मार्गाच्या पाहणीतही महाराष्ट्राचा समावेश नाही. रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण करण्याबाबतही महाराष्ट्राला काही मिळालेलं नाहीत.खरं तर बजेट म्हटलं की आकडेवारी आणि रुक्ष तपशील हेच चित्र डोळ्यांसमोर येतं. पण लालूंचं बजेटही लालूंसारखं हटके असल्याचं जाणवलं. कोणतही महत्त्वाचं काम करण्यापूर्वी सामान्यत: देवाचे आशीर्वाद घेतले जातात. पण रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आपल्या आवडत्या गायी म्हशींच्या शुभेच्छा घेतल्या. जागतिक मंदीच्या या काळातही रेल्वेनं आर्थिक क्षमता उत्तमरित्या टिकवून ठेवली आणि मंदीचा परिणाम न होऊ देता रेल्वेनं उत्पन्न वाढवून दाखवलं असा दावा केंद्रीय रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी आज रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना केला. अशा प्रकारे रेल्वेखात्यानं उत्तम कारभाराचं उदाहरण दिलं आहे, असंही लालू म्हणाले. भारतीय रेल्वेनं नेहमीच प्रवाश्यांची काळजी घेत प्रवासी भाड्यात कपात केलीय हे लालूप्रसादांनी अर्थसंकल्प वाचताना ठासून सांगितलं. आजच्या बजेटमध्ये त्यांनी रेल्वेची प्रवासी संख्या वाढत असल्याचं सांगत सर्व लांब पल्ल्यांच्या एसी वर्गांचं भाडं कमी केल्याची घोषणा केली. 90 हजार कोटींचा फायदा रेल्वेला झालाय, असं लालू अर्थसंकल्प वाचताना म्हणाले. आणि आम आदमी वर कुठलाही बोजा पडू दिला नाही या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. जिथे खाजगी कंपन्यात सगळीकडे कामगार कपात होतेय तिथे रेल्वेनं कर्मचार्‍यांच्या हिताला प्राधान्य दिलंय याकडे लालूंनी लक्ष वेधलं. आगामी पंचवार्षिक योजनेत 2, लाख 30 हजार कोटींची गुंतवणूक रेल्वे करणार आहेत. ही 10व्या पंचवार्षिक योजनेच्या तुलनेत तिप्पट गुंतवणूक आहे, असंही लालूंनी सांगितलं. भारतीय रेल्वेनं नेहमीच प्रवाश्यांची काळजी घेत प्रवासी भाड्यात कपात केलीय हे लालूप्रसादांनी ठासून सांगितलं. आजच्या बजेटमध्ये त्यांनी रेल्वेची प्रवासी संख्या वाढत असल्याचं सांगत सर्व लांब पल्ल्यांच्या एसी वर्गांचं भाडं कमी केल्याची घोषणा केली. लालूंच्या बजेटवर मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे जनरल सेक्रेटरी कैलाश वर्मा आणि डोंबिवली पॅसेंजर असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी भालचंद्र लोहकरे यांनी नाराजी व्यक्त केलीये. यंदाच्या रेल्वेच्या बजेटमध्ये प्रवाशांच्या तोंडाला पानं पुसल्याचं दोघांचं मत पडलं. तर " यंदाचा बजेट हा भारताच्या दृष्टीनं उत्तम आहे. पण महाराष्ट्र मुंबईसाठी फारशा तरतुदी नसल्याची खंत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी व्यक्त केलीये. आगामी लोकसभा निवडणुकीचा मुद्दा समोर ठेवून लालूंनी बजेट मांडल्याचंही हेमंत देसाई म्हणाले. मात्र लालूंच्या अर्थसंकल्पावर मुंबई आणि मुंबईबाहेरचे प्रवासीही नाराज आहेत. लालूंच्या रेल्वेबजेटमध्ये मुंबईला-महाराष्ट्राला ठेंगा देण्यात आलाय- लोकलमधल्या वाढत्या गर्दीवर काहीही उपाय नाही.नव्या लोकल ट्रेनची घोषणा नाही.रेल्वे स्टेशनवरील सोयीसुविधा वाढवण्यासाठी.35 हजार 900 कोटींची तरतूद.पण मुंबईसाठी खास घोषणा नाही.मुंबईसाठी काही खास घोषणा केल्या नसल्या तरी लालूंनी मुंबईवरून सुटणार्‍या अनेक गाड्यांच्या फेर्‍यांमध्ये वाढ केलीय. मुंबईवरून सुटणार्‍या गाड्यांच्या फेर्‍या पुढीलप्रमाणे - मुंबई- थिरुवअनंतपुरम - आठवड्यातून 2 वेळा करण्यात आलीय. मुंबई-वाराणसी एक्सप्रेस -रोज सुरू करण्यात आलीय.मुंबई-बिकानेर सुपरफास्ट -आठवड्यातून 2 वेळा सुरू करण्यात आलीय.मुंबई-मच्छलीपट्टणम सुपरफास्ट -आठवड्यातून 2 वेळा सुरू करण्यात आलीयमुंबई-गोरखपूर रेल्वे-रोज सुटणारेय.मुंबई-जोधपूर रेल्वे - आठवड्यातून एकदा सुरू करण्यात आलीय.वेरावळ -मुंबई एक्सप्रेस रोज सुटणारेय.मुंबई- अमरावती रेल्वे - रोज सुटणारेय.मुंबई- कारवार - ही नवीन गाडी सुरू करण्यात आलीय.तर पुणे- पाटणा एक्सप्रेस - आठवड्यातून रोज सुटणारेय.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Feb 13, 2009 07:12 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 13, 2009 07:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...