ऊसदरप्रश्नी चर्चेचं गुर्‍हाळ सुरूच

ऊसदरप्रश्नी चर्चेचं गुर्‍हाळ सुरूच

  • Share this:

cane26 नोव्हेंबर : ऊस दरवाढ प्रश्नी राज्यात तर तोडगा निघू शकला नाही पण दिल्ली दरबारीही तिच परिस्थिती कायम राहिली. आज मंगळवारी सर्वपक्षीय समितीनं पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. मात्र या बैठकीतून महाराष्ट्राच्या हाताला काहीही लागलं नाही.

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगट या संदर्भात निर्णय घेणार आहे. हा मंत्रिगट येत्या 10 ते 15 दिवसात आपला निर्णय देणार असल्याची शक्यता आहे. मात्र या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री के. व्ही. थॉमस आणि शरद पवार हे तिन्ही मंत्री उपस्थित नव्हते.

आजच्या या बैठकीत पंतप्रधानांनी शरद पवार यांचा उल्लेख केल्याची माहिती कळतंय. काँग्रेस या सगळ्या वादातून आता अंग काढून घेतंय असा याचा अर्थ काढला जात आहे. मात्र दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन सुरूच राहणार असं स्पष्ट केलंय

First published: November 26, 2013, 10:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading