ही तर काँग्रेसची हुकूमशाही -मोदी

ही तर काँग्रेसची हुकूमशाही -मोदी

  • Share this:

modi on congress15 नोव्हेंबर : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी माझी स्तुती केली, म्हणून काँग्रेसच्या पोटात दुखतंय त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी लतादीदींना देण्यात आला देशातला सर्वोच्च सन्मान भारतरत्न परत घेण्याची मागणी केली ही भाषा लोकशाहीची नसून हुकूमशाहीची आहे अशी सडकून टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केली. छत्तीसगडमधल्या रायगडमध्ये प्रचारसभेत ते बोलत होते.

जर कुणाला आपलं मत मांडण्याचा अधिकार नसले तर या देशात लोकशाही आहे की नाही असा सवालही त्यांनी विचारला. पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी नरेंद्र मोदी माझ्या भावासारखे असून त्यांनी पंतप्रधान व्हावं अशी इच्छा व्यक्त केली होती.

लतादीदींच्या या विधानावर काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केली. लतादीदींना संघाच्या विचाराची जाणीव झाल्यावर ते आपलं विधान मागे घेतील अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली होती. तर त्यांच्यापाठोपाठ दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर यांनी वादग्रस्त टीका केली होती. नरेंद्र मोदींना ज्या ज्या लोकांनी पाठिंबा दिला त्यांना देण्यात आलेले पद्म पुरस्कार परत घ्यावे अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवर विरोधकांनी टीका तर केलीच मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आज नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या नेत्यांचा समाचार घेत सडकून टीका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2013 04:06 PM IST

ताज्या बातम्या