'आम आदमी'कडे 19 कोटींचा निधी आला कसा ?

'आम आदमी'कडे 19 कोटींचा निधी आला कसा ?

 • Share this:

aam admi 4रूपश्री नंदा, नवी दिल्ली

11 नोव्हेंबर : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने आतापर्यंत 19 कोटी रुपये उभारलेत. ते कुणी दिले, याचा तपशील त्यांच्या वेबसाईटवरही आहे. पण, इतर कुठल्याच राजकीय पक्षानं अशाप्रकारे आपल्या निवडणूक निधीचा तपशील दिलेला नाही.

अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांचे मार्ग वेगळे झाले तेव्हा या आंदोलनासाठी उभारण्यात आलेल्या निधीवरून वाद उभा राहिला होता. त्यावेळी केजरीवाल यांनी 2 कोटी रुपये अण्णांना परत करण्याची तयारी दाखवली होती. पण, अण्णांनी ते नाकारलं. पण, आपलं राजकारण संपूर्णपणे पारदर्शक आहे, हे सांगण्याची वेळ आम आदमी पार्टीवर आलीय. सौरभ गर्ग नावाच्या व्यक्तींने दिलेले 50 हजार रुपये तो व्यक्ती भारतीय नसल्यामुळे आपण नाकारले, असं पक्षाचं म्हणणंय. तर बोस्टनमधल्या एका व्यक्तीने दिलेले 50 डॉलरसुद्धा त्याच्याकडे पासपोर्टची माहिती नसल्यानं पक्षानं नाकारलं होते.

Loading...

आम आदमी पार्टीच्या म्हणण्यानुसार दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचं बजेट हे 20 कोटी रुपयांचं आहे. प्रत्येक उमेदवारासाठी 14 लाख रुपये याप्रमाणे एकूण 70 उमेदवारांसाठी पक्षाला 9 कोटी 80 लाख रुपये लागणार आहेत. तर पोस्टर, बॅनर आणि प्रचारासाठी पक्षाला 10 कोटी रुपये लागणार आहे. आतापर्यंत पक्षानं 17 कोटी रुपये उभारलेत. यातला एक तृतिआंश निधी हा परदेशात राहणार्‍या भारतीयांनी दिलाय.

पक्षासाठी पारदर्शपणे निधी उभारणं हे पक्षापुढे मोठं आव्हान आहे. 26 नोव्हेंबर 2012 ला पक्षाची स्थापना झाली. त्यावेळी निवृत्त न्यायाधीश शांती भूषण यांनी पक्षाला 1 कोटी रुपये डोनेशन दिलं होतं. त्यानंतर पक्षाने घरो-घरी जाऊन निधी उभारला. त्यानंतर यावर्षी जानेवारीत पक्षानं डोनेशनसाठी ऑनलाईन मोहीम सुरू केली. मे महिन्यापर्यंत पक्षाला रोज 3 ते 4 लाख रुपये मिळायचे. ऑक्टोबरपर्यंत ते 10 ते 12 लाख रुपयांपर्यंत पोचले. तर आमच्या मोहिमेमुळे 19 ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी 27 लाख रुपये मिळाल्याचा दावा पक्षानं केलाय.

आम आदमी पार्टी : निवडणूक खर्च

 • दिल्ली निवडणुकीचं बजेट : 20 कोटी रु.
 • प्रत्येक उमेदवारासाठी : 14 लाख रु.
 • 70 उमेदवारांसाठी : 9 कोटी 80 लाख रु.
 • प्रचारासाठी खर्च : 10 कोटी रु.

 

देणगी

 • मे : 71 लाख 73 हजार 622 रु.
 • जून : 90 लाख 91 हजार 381 रु.
 • जुलै : 1 कोटी रु.
 • ऑगस्ट : 2 कोटी 67 लाख 56 हजार 129 रु.
 • सप्टेंबर : 4 कोटी 19 लाख 47 हजार 421 रु.
 • आणि 25 ऑक्टोबरला पक्षानं 3 कोटी 81 लाख 76 हजार 17 रुपये जमले, अशी माहिती पक्षाच्या वेबसाईटवर दिलीय

निधी उभारण्यासाठी पक्षाला मोठी मदत झालीय ती सोशल मीडियाची...अरविंद केजरीवाल हँगआऊट त्यासाठी फार उपयोगी ठरलं. रविवारी केजरीवाल यांनी सिंगापूरमधल्या भारतीयांना आवाहन केलं. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतल्या पटपडगंजमध्ये सभा घेतली आणि अवघ्या 2 तासांत 9 हजार रुपये जमवले.

भारतातल्या निवडणुकांमध्ये पैसा पाण्यासारखा खर्च केला जातो. पण, काँग्रेस, भाजप, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस यासारख्या बड्या राजकीय पक्षांनी त्यांच्या पैशांचा हिशेब कधीच दिलेला नाही. आम आदमी पक्ष त्याला अपवाद ठरलाय आणि हेच इतर राजकीय पक्षांसमोर मोठं आव्हान ठरलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2013 10:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...