मंत्र्यांचे तोंडी आदेश ऐकू नका : सुप्रीम कोर्ट

मंत्र्यांचे तोंडी आदेश ऐकू नका : सुप्रीम कोर्ट

  • Share this:

supremecourt1 नोव्हेंबर : 'मंत्र्यांनी सांगितलं...'किंवा 'हे घ्या साहेबांशी बोला' असली अरेरावी आता चालणार नाही कारण सुप्रीम कोर्टाने मंत्र्यांच्या या आदेशावर गद्दा आणला आहे.

मंत्र्यांनी दिलेले तोंडी आदेश पाळू नका असे स्पष्ट आदेश सरकारी सनदी अधिकार्‍यांना सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. माजी कॅबिनेट सचिव टीएसआर सुब्रह्मण्यम आणि इतर 83 निवृत्त नोकरशहांनी यासंदर्भात जनहीत याचिका दाखल केली होती. यावर कोर्टाने हा महत्वपुर्ण निकाल दिला.

याबरोबर राजकीय हस्तक्षेप करून अधिकार्‍यांच्या बदल्या करणं थांबवा आणि त्यांच्या बदलीसाठी कालावधी निश्चित करा असे महत्त्वपूर्ण आदेशही सुप्रीम कोर्टाने दिलेत. बदली, शिस्तभंगाची कारवाई अशा बाबींवर विचार करण्यासाठी केंद्रात आणि प्रत्येक राज्यात स्वतंत्र नागरी सेवा मंडळ स्थापन करावेत असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

नोकरशाहीचा दर्जा खालावण्याला त्यांच्या कामात होणारा राजकीय हस्तक्षेप कारणीभूत आहे आणि सनदी अधिकार्‍यांना त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी निश्चित काळासाठी कायम राहण्याची हमी दिली तर नागरी सेवांमध्ये व्यवसायिक सचोटी आणि कार्यक्षमता वाढेल आणि पर्यायाने सुप्रशासनाला गती मिळेल असं मतही कोर्टाने नोंदवलंय. या संदर्भातला कायदा येत्या 3 महिन्यांत करावा असे आदेशही कोर्टाने दिलेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2013 02:28 PM IST

ताज्या बातम्या