29 ऑक्टोबर : पाटण्यात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सभा घेऊन मोदींवर जोरदार हल्ला चढवला. बिहारमधल्या नालंदा जिल्ह्यात संयुक्त जनता दलाचं चिंतन शिबिर पार पडलं. यावेळी नितीशकुमार यांनी मोदींच्या हुंकार रॅलीची खिल्ली उडवली.
मोदी कोणतेही पाठपुरावे देऊन भरसभेत साफ खोटे बोलतात. माझ्यावर टीका करतांना इतका घाम का फुटतो. भाषणाच्या वेळी किती घाम पुसत होते. इतका हा उतावीळपणा कशाला हवा. देशाचं नेतृत्व करणार्या नेता धैर्यवान असायला हवा अशी टीकाही नितीशकुमारांनी केली.
तसंच गुजरातचे लोकं सर्वाधिक आईस्क्रीम खातात. देशभरात जितकी आईस्क्रीम फस्त केली जाते त्याच्या तुलनेत अर्धी आईस्क्रीम ही गुजरातमध्ये फस्त होते मग इतक गोड खाऊनही मोदी कडू का बोलतात. त्यांची वाणी गोड का नाही. देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणार आहात तर थोडा धीर धरा अशी खिल्लीही नितीशकुमारांनी उडवली.